ETV Bharat / bharat

IND vs SA T20 Series : दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेसाठी हे दोन खेळाडू संघात दाखल, शमीबद्दल चाहते झाले निराश

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका संघात टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका ( IND vs SA T20 Series ) 28 सप्टेंबरपासून तिरुअनंतपुरममध्ये सुरू होत आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी ही मालिका टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे.

IND
भारत
author img

By

Published : Sep 27, 2022, 1:24 PM IST

नवी दिल्ली: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कोविड-19 मधून बरा झाला ( Shami did not recover from covid ) नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला ( Mohammed Shami ruled out against South Africa ) आहे. हार्दिक पंड्याच्या जागी बंगालचा अष्टपैलू शाहबाज अहमदचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. 28 सप्टेंबरपासून तिरुवनंतपुरममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका ( IND vs SA T20 Series ) सुरू होत आहे.

अष्टपैलू दीपक हुड्डालाही पाठीत ताण आल्यामुळे मालिकेतून बाहेर करण्यात आले आहे. राष्ट्रीय निवड समिती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरचा ( Shreyas Iyer replace Deepak Hooda ) संघात समावेश करण्यास तयार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, शमी कोविड-19 मधून बरा झालेला नाही. त्याला आणखी वेळ हवा आहे. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर असेल. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी शमीच्या जागी उमेश यादव संघात राहील.

तथापि, पांड्याच्या जागी शाहबाजला ( Shahbaz Ahmed replace Hardik Pandya ) का निवडण्यात आले आहे, असे विचारले असता, सूत्राने सांगितले की, “हार्दिकच्या जागी कोणी वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे का? राज बावा याच्याकडे फारच कमी अनुभव आहे आणि म्हणूनच त्याला अनुभव देण्यासाठी आम्ही त्याला भारत अ संघात ठेवले आहे. त्याला चमकण्यासाठी वेळ हवा आहे. मला दुसरे नाव सांगा? दरम्यान, सौराष्ट्रविरुद्धच्या इराणी चषक सामन्यात शेष भारत संघाचे नेतृत्व हनुमा विहारी करणार आहे.

भारतीय संघ ( Team India For South Africa Series ) :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह श्रेयस अय्यर.

हेही वाचा - Taniya Bhatia Robbed In London : लंडनमध्ये महिला क्रिकेटपटू तानिया भाटियाच्या साहित्याची झाली चोरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.