नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या राष्ट्रपतींच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका IAS अधिकारी शाह फैसल यांनी सर्वोच्च न्यायालयातून मागे घेतली आहे. कलम ३७० च्या तरतुदी रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या २३ याचिकाकर्त्यांपैकी फैसल यांचा समावेश होता. शाह फैसल यांचा याचिका मागे घेण्याचा निर्णय या वर्षी एप्रिलमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतून काढून टाकल्यानंतर आणि सांस्कृतिक मंत्रालयात उपसचिव म्हणून नियुक्त केल्यानंतर काही महिन्यांनंतर आला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करतेवेळी फैसल यांनी २०१९ मध्ये सेवेचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांचा राजीनामा सरकारने स्वीकारला नाही आणि नंतर तो मागे घेतला. राजीनामा देताना त्यांनी ट्विट केले होते की, काश्मीरमधील हत्यांचा निषेध करण्यासाठी आणि केंद्र सरकारकडून कोणताही विश्वासार्ह राजकीय पुढाकार नसल्यामुळे मी आयएएसचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मिरी जीवन माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
मार्च 2019 मध्ये त्यांनी जम्मू आणि काश्मीर पीपल्स मूव्हमेंट ( JKPM ) हा स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केला होता. आता त्यांनी कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका मागे घेतली आहे.