ETV Bharat / bharat

गुजरातमध्ये कार आणि डंपरचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जळून मृत्यू

सुरेंद्रनगर जिल्ह्यात कार आणि डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कारमधील सात जणांचा जळून मृत्यू झाला आहे. ही घटना पाटडी तालुक्यातील खेरवा गावाजवळ घडली.

author img

By

Published : Nov 21, 2020, 11:53 AM IST

Updated : Nov 21, 2020, 12:00 PM IST

accident
अपघात

सुरेंद्रनगर (गुजरात) - जिल्ह्यात कार आणि डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कारमधील सात जणांचा जळून मृत्यू झाला आहे. ही घटना पाटडी तालुक्यातील खेरवा गावाजवळ घडली. कार आणि डंपरच्या अपघातानंतर डंपरचालक फरार झाला आहे.

एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू -

खेरवा गावाजवळ झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मृतांपैकी ४ जण सांतलपुरच्या कोरडा गावातील रहिवासी होते. तर, तिघेजण राधनपूरच्या नानापुरा गावातील रहिवासी होते.

धार्मिक स्थळाहून दर्शन घेऊन परतत होते मृत -

सर्व मृत हे चोटीला या धार्मिक स्थळाहून दर्शन करून घरी परतत होते. यादरम्यान हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर मृत कारबाहेर निघण्यापुर्वीच कारने पेट घेतल्याने होरपळून त्यांचा मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - लग्नावरुन परतणाऱ्या १४ वऱ्हाडींवर काळाचा घाला; उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधील घटना

तीन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये तीन अपघातात १५ जणांचा मृत्यू -

गुजरातमधील बडोदा-अहमदाबाद महामार्गावर वाघोडीया चौकात बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला होता. डंपर आणि मिनी बसमध्ये धडक होऊन हा अपघात झाला. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला तर १७ जखमी झाले होते. एक लहान मुलासह दोन महिला आणि दोन पुरूषांसह ११ जण या अपघातात ठार झाले.

कोठारियामध्येही अपघात..

तसेच सुरेंद्रनगर-लखतर रस्त्यावर असणाऱ्या कोठारिया गावाजवळ एका चारचाकीचा अपघात झाला. यात गाडीतील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.

सूरत-धुळे महामार्गावर अपघात..

सूरत-धुळे महामार्गावर कदोडरा बारडोलीमध्ये एका चौकात दोन बसची समोरासमोर टक्कर झाली. या दुर्घटनेत २० लोक जखमी झाले होते.

देशातील मोठ्या अपघातांवर एक नजर..

मध्य प्रदेशातील शिवपुरीत झालेल्या अपघातात ११ ठार

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील पोहरी पोलीस ठाणे परिसरातील काकरा गावाजवळ १४ नोव्हेंबर (शुक्रवारी) भीषण अपघात झाला होता. या अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त पिकअप गाडीत 40 लोक होते. यातील 15 जण वाहनाखाली दबले होते. यापैकी 8 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तिघांचा रुग्णालयात पोहोचल्यानंतर मृत्यू झाला होता.

महाराष्ट्र ऐन दिवाळीत ८ जणांना रस्ते अपघातात गमवावा लागला जीव

ऐन दिवाळीत दोन वेगवेगळ्या अपघातात 8 जणांनी आपले प्राण गमावले होते. तर 19 जण जखमी झाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात झाला होता. या अपघातात 3 जण ठार झाले तर 13 जण जखमी झाले होते. दुसरा अपघात पुणे- बंगळुरू आशियाई महामार्गावर उंब्रज (ता.कराड) येथ झाला होता. तारळी नदीच्या पुलाचा कठडा तोडून ट्रॅव्हलर बस 50 फूट खोल नदीपात्रात कोसळली. यामध्ये ट्रॅव्हलरमधील 5 जण जागीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभिर जखमी होते. हा अपघातही १४ नोव्हेंबरला झाला.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही अपघात

११ नोव्हेंबर ला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जवळ काच वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला होता. यात 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले होते. तलासरी तालुक्यातील वडवली गावाजवळ ही घटना घडली होती.

Last Updated : Nov 21, 2020, 12:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.