हैदराबाद - रचकोंडा पोलिसांनी शहरामधून १७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून ६ लाखांची रोकड, कार आणि १० मोबाईल जप्त केले आहेत.
पोलिसाच्या माहितीनुसार बेल्लमकोंडा मुरली कृष्णा हा आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. हा आरोपी बनावट नोटा आणि बनावट रत्नांचा हैदराबादमध्ये व्यवसाय करत होता. महिनाभरापूर्वी आरोपीने त्याच्या भागीदाराविरोधात घर व रत्ने लुबाडण्याची पोलिसात तक्रार केली होती. तसेच भागीदारांविरोधात फसवणुकीची तक्रारही पोलिसांत नोंदविली होती.
हेही वाचा-शोपियानमध्ये दहशतवाद्याचा खात्मा; पोलिसांसह सुरक्षा दलाकडून एन्काउन्टर
बनावट रत्नांद्वारेही करत होता फसवणूक-
या प्रकरणी तपास करताना पोलिसांनी आरोपीकडून ६,३२,००० जप्त केले आहेत. कृष्णा हा बनावट रत्नांची वेबसाईट चालवित होता. तसेच उच्चभ्रू लोकांना बनावट नोटा पुरवित होता. त्याने काही ग्राहकांना २ हजार रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसविले होते.
हेही वाचा-नितीन गडकरी-मुख्यमंत्र्यांसमोरच एसपी व सुरक्षा अधिकारी भिडले!
चंदुलूरी नागेंद्र प्रसाद, वेलपुरी, पवन कुमार, दोंडापती रामकृष्णा, नलाबोथूला सुरेश गोपी, चंदुलूरी विजय कुमार आणि कम्बापती सुर्यम हेदेखील आरोपींच्या व्यवसायामध्ये सहभागी होते.