ETV Bharat / bharat

COVID 19 vaccine सीरमकडून अमेरिकेच्या कोवोवॅक्सचे उत्पादन सुरू

सीरमने ऑगस्ट २०२० मध्ये अमेरिकेच्या एनव्हीएक्स सीओव्ही २३७३ या लशीच्या विकसन आणि व्यापारीकरणासाठी परवाना घेतला आहे. या लशीचे अखेर आज पुण्यात उत्पादन सुरू झाले आहे.

Covovax in India
कोवोवॅक्सचे उत्पादन
author img

By

Published : Jun 25, 2021, 4:45 PM IST

पुणे- सीरमने लस उत्पादनात शुक्रवारी नवा मैलाचा दगड गाठला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (सीरम) पुण्यातील उत्पादन प्रकल्पामधून कोरोना लस कोवोवॅक्सचे उत्पादन शुक्रवारपासून सुरू केले आहे. ही लस अमेरिकन जैवतंत्रज्ञान कंपनीने विकसित केली आहे.

कोवोवॅक्सचे उत्पादन सुरू झाल्याची घोषणा सीरमने ट्विटर केली आहे. कंपनीने ट्विटमध्ये म्हटले, की कोवोवॅक्सच्या पहिल्या बॅचचे आमच्या पुण्यातील प्रकल्पामधून उत्पादन सुरू झाले आहे.

हेही वाचा-सीरमकडून लस मिळत असतानाही भाजप पुणेकरांच्या जीवाशी का खेळतंय? - मोहन जोशी

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी कोवोवॅक्सच्या वैद्यकीय चाचण्या देशात सुरू होणार असल्याचे मार्च २०२१ मध्ये म्हटले होते. ही लस सप्टेंबरमध्ये लाँच होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. सध्या कंपनीकडून कोव्हिशिल्डचे उत्पादन घेण्यात येत आहे. ही लस कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये विकण्यात येत आहे.

हेही वाचा-COVAXIN च्या निर्मितीत गोवंशाच्या सीरमचा वापर नाही- आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

अशी आहे कोवोवॅक्स-

  • सीरमने ऑगस्ट २०२० मध्ये अमेरिकेच्या एनव्हीएक्स सीओव्ही २३७३ या लशीच्या विकसन आणि व्यापारीकरणासाठी परवाना घेतला आहे.
  • ही लस उच्च-मध्यम आणि उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सीरम विकणार आहे.
  • कोवोवॅक्स लस आफ्रिका आणि आशियामधील कोरोना व्हेरियंटवर ८९ टक्के कार्यक्षम आहे.
  • कोवोवॅक्स ही सीरमकडून उत्पादन होणारी दुसरी लस आहे.

नुकतेच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला खासगी विमानाने भारतात परतले आहेत. कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून धमक्या मिळत असल्याने ते लंडनला गेल्याची चर्चा होती. यानंतर सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचे

हेही वाचा-अदर पूनावाला पुण्यात परतले, मोठ्या नेत्यांकडून धमक्या मिळत असल्याने सोडला होता देश जाहीर केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.