मुंबई - शेअर बाजारात आज व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 973.1 अंकांच्या म्हणजेच 1.62 टक्क्यांच्या वाढीसह 60,905.34 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 223.30 अंकांच्या किंवा 1.38 टक्क्यांच्या वाढीसह 17,854.05 च्या पातळीवर बंद झाला. सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्समधली आजची ही वाढ गुंतवणूकदारांना दिलासा देणारी होती.
टायटन आणि बजाज फिनसर्व्ह टॉप गेनर्स ठरले : टायटन, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, यूपीएल, इंडसइंड बँक, एचडीएफसी आणि एसबीआय लाईफ या 29 निफ्टी-50 समभागांमध्ये वाढ होत आहे. दुसरीकडे, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, डिव्हिस लॅब, बीपीसीएल, हिंदाल्को, टाटा कंझ्युमर, एचडीएफसी लाईफ आणि हिरो मोटोकॉर्प यांच्यासह 21 निफ्टी समभाग घसरत आहेत.
अदानी एंटरप्रायझेसचे शेअर घसरले : बाजारातील या तेजीमध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. अदानी एंटरप्रायझेसमध्ये 17% आणि अदानी ट्रान्समिशनमध्ये 10% पेक्षा जास्त घट दिसून येत आहे. याशिवाय अदानी पोर्ट्स, टोटल गॅस, विल्मर आणि पॉवरमध्ये जवळपास 5-5% ची घसरण दिसून येत आहे. दुसरीकडे, अदानी समूहाने अलीकडेच विकत घेतलेल्या कंपन्या, अंबुजा सिमेंट NDTV 5%, अंबुजा सिमेंट 2% आणि ACC 1% पेक्षा जास्त घसरत आहे. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे वरील शेअर्स मध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार अडचणीत सापडले आहेत.
मेटल क्षेत्रात सर्वाधिक 2% घसरण दिसुन आली : NSE च्या 11 क्षेत्रीय निर्देशांकांपैकी 4 वर वाढ आणि 7 मध्ये घसरण दिसून येत आहे. मेटल सेक्टरमध्ये सर्वाधिक 2% ची घसरण दिसून येते. रिअल्टी क्षेत्रातही १% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. याशिवाय एफएमसीजी, आयटी, मीडिया, फार्मा आणि पीएसयू बँक क्षेत्रात थोडीशी घसरण झाली आहे. दुसरीकडे, बँक, वाहन, वित्तीय सेवा आणि खाजगी बँक क्षेत्रात किंचित वाढ झाली आहे.
चढ-उतार दिसुन आली : जागतिक बाजारपेठेतील काल बीएसईचा ३० शेअर्सचा बेंचमार्क सेन्सेक्स ९०९.६४ अंकांनी किंवा १.५२ टक्क्यांनी वाढून ६०,८४१.८८ वर स्थिरावला. तर आज दिवसभरात तो 973.1 अंकांनी किंवा 1.62 टक्क्यांनी वाढून 60,905.34 वर पोहोचला. विस्तृत NSE निफ्टी 243.65 अंकांनी किंवा 1.38 टक्क्यांनी वाढून 17,854.05 वर बंद झाला.
'हे' होते आजचे विजेते : सेन्सेक्स पॅकमधून टायटन, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा आणि इंडसइंड बँक हे प्रमुख विजेते होते. एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो आणि टेक महिंद्रा हे पिछाडीवर होते.