ETV Bharat / bharat

N.D.Patil Passed Away : कष्टकऱ्यांचा आधार हरपला! शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी.पाटील यांचे निधन - Life journey of ND Patil

शेतकरी, कामगार कष्टकरी, महिला यांच्यासह सबंध शोषित वर्गासाठी संपुर्ण आयुष्य पणाला लावणारा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी पाटील यांचे वृध्दापकाळाने कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 93 वर्षांचे होते.

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी.पाटील यांचे निधन

author img

By

Published : Jan 17, 2022, 12:37 PM IST

Updated : Jan 17, 2022, 1:41 PM IST

कोल्हापूर : शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय जीवनात गेल्या सुमारे गेल्या सत्तर वर्षा पासून धडाडीचे आणि लढाऊ नेते अशी ओळख असलेले (N. D. Patil passed away) प्राध्यापक एन.डी.पाटील यांचे निधन झाले आहे. मृत्यू समयी ते 93 वर्षांचे होते. (Life journey of ND Patil) कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वातावरणात बदल झाल्याने त्यांना कणकण वाटत होती. (Shetkari Kamgar Paksh) त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (ND Patil Senior leader of the Shetkari Kamgar Paksha) दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र या वयातही एन.डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती.

त्रास होईल असे उपचार करू नयेत अशी त्यांची इच्छा होती

डॉ.अशोक भूपाळी यांनी एन.डी. पाटील यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. एन.डी. पाटील 8 वर्ष आपल्याकडे उपचार घेत आहेत. त्यांची एक किडनी काढली आहे. 11 जानेवारीला त्यांचे बोलणे बंद झाले. त्याच दिवशी काही तपासणी करून त्यांना अ‌ॅडमिट केले गेले होते. अशी माहिती डॉ. अशोक भूपाळी यांनी दिली होती. ऍडव्हान्स ट्रीटमेंट देऊन त्रास होईल असे उपचार करू नयेत अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे कोणताही मोठा उपचार केले नाही. असही डॉ. भूपाळी म्हणाले आहेत.

विवेकी अवाज हरपल्याने आज अखंड महाराष्ट्र शोकसागरात बुडाला

गेली सत्तर वर्ष महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, कामगार महिला अशा अनेक घटकांसाठी संघर्षाची मशाल पेटवलेले आणि अविरत यातील प्रश्नांशी लढा देणारे एनडी पाटी यांचे निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात एनडी पाटील यांचे योगदन अमुल्य आहे. आसा हा महाराष्ट्राचा विवेकी अवाज हरपल्याने आज अखंड महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. सर्वच क्षेत्रातून शोक भावना व्यक्त होत आहेत.

एनडी पाटील यांचा जीवनप्रवास

एनडी पाटील यांचे नाव नारायण ज्ञानदेव पाटील असे होते. त्यांचा जन्म १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील नागावमधील ढवळी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला होता. आपल्या सुरुवातीपासू कौटुंबीक अडचणींचा सामना करत त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए आणि एल.एल.बी हे शिक्षण घेतले होते.

अध्यापन कार्य –

१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्राध्यापक. तसेच, 'कमवा व शिका' या योजनेचे प्रमुख व रेक्टर
१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य.

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य –

शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य (१९६२)
शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य (१९६५)
शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य (१९६२-१९७८)
शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन (१९७६-१९७८)
सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य (१९९१)
रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून

राजकीय कारकीर्द –

शेतकरी कामगार पक्षात प्रवेश (१९४८)
मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस (१९५७)
महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य- १९६०-६६, १९७०-७६, १९७६-८२ ( १८ वर्षे)
शेकापचे सरचिटणीस - १९६९- १९७८, १९८५ – २०१०
सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य -(१९७८-१९८०)
महाराष्ट्र विधानसभा सदस्य -१९८५-१९९०- (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार -१९९९-२००२
महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

मिळालेले पुरस्कार/ सन्मान –

भाई माधवराव बागल पुरस्कार – (१९९४)
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड – डी.लीट.पदवी, (१९९९)
राष्ट्रीय बियाणे महामंडळ (अध्यक्षपद )भारत सरकार – (१९९८ – २०००)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, (२०००)
विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- (२००१)
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

भूषविलेली पदे –

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी – उपाध्यक्ष
अंधश्रद्धा निमूर्लन समिती, महाराष्ट्र – अध्यक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, सातारा – अध्यक्ष
जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
म. फुले शिक्षण संस्था,इस्लामपूर – अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था, बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

प्रसिद्ध झालेले लेखन –

समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका - १९६२)
कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट पुस्तिका -१९६२)
शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका - १९६३)
वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट (पुस्तिका - १९६६)
महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका १९६७)
शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत (पुस्तक - १९७०)
शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका - १९९२)
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (पुस्तिका)
नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने)

Last Updated : Jan 17, 2022, 1:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.