ETV Bharat / bharat

Goa Assembly Election 2022 : शिवसेनेने साथ दिल्यास गोवा विधानसभा निवडणुकीत युती - पी. चिदंबरम - गोवा काँग्रेस विधानसभा निवडणूक तयारी

काँग्रेसने युपीएला एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम ( senior congress leader P Chidambaram ) यांनी व्यक्त केले. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा वेगळा दृष्टीकोन आहे. आमचा वेगळा दृष्टीकोन आहे. जर दोन्ही एकत्रित आले तर देशासाठी चांगले असेल, असे मत माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांनी व्यक्त केले.

पी चिदंबरम
पी चिदंबरम
author img

By

Published : Dec 9, 2021, 7:04 PM IST

Updated : Dec 9, 2021, 9:04 PM IST

पणजी - एनडीएमधूनबाहेर पडल्यानंतर शिवसेना यूपीएमध्ये सामील होणार का, यावर सध्या चर्चा सुरू आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. शिवसेनेने साथ दिल्यास भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस त्यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीत युती करणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांनी सांगितले. ते पत्रकार परिषेदत बोलत होते.

गोव्यात फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना काँग्रेस सबत युती करून निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संजय राऊत यांनी नुकतीच प्रियांका गांधी यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चाही केली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने आम्हाला साथ दिल्यास आम्ही नक्कीच युतीचा विचार करणार असल्याचे माजी केंद्रीय अर्थमंत्री व राज्याचे निवडणूक प्रभारी पी. चिदंबरम यांनी सांगितले.

यंदा नवीन चेहऱ्यांना संधी देणार-

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडून आलेल्या सर्वच आमदारांनी पक्षाला धोका दिला. ती चूक आता पुन्हा होणार नसल्याचे ही चिदंबरम यांनी सांगितले.

आम्ही नक्कीच युतीचा विचार करणार

काँग्रेसने युपीएला एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करावेत

काँग्रेसने युपीएला एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम ( senior congress leader P Chidambaram ) यांनी व्यक्त केले. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा वेगळा दृष्टीकोन आहे. आमचा वेगळा दृष्टीकोन आहे. जर दोन्ही एकत्रित आले तर देशासाठी चांगले असेल, असे मत माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांनी व्यक्त केले.

गोवा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची ( Goa Assembly election 2022 ) यादी काँग्रेस ( Goa congress candidates list ) लवकरच जाहीर करणार आहे. भाजपशिवाय देशात विरोधकांची आघाडी करण्याचे वक्तव्य संजय राऊत ( Sanjay Raut on opposition in the country ) यांनी नुकतेच केले होते.

हेही वाचा-गोवा विधानसभा निवडणुकीत सर्व 40 जागा लढणार; मनीष सिसोदिया यांची घोषणा

काँग्रेस व शिवसेनेची युती होण्याची शक्यता-

एनडीएमधूनबाहेर पडल्यानंतर शिवसेना यूपीएमध्ये सामील होणार का, यावर सध्या चर्चा सुरू आहे. बुधवारी (दि. 8) शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांची भेट घेतली या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे राऊत यांनी सांगितले. भविष्यात काँग्रेस आणि शिवसेना आगामी उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुका एकत्र लढवू शकते, असे संकेतही राऊत यांनी दिले आहेत.

हेही वाचा-ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा; शिवसेना विधानसभेच्या 22 जागांवर निवडणूक लढविणार- संजय राऊत

.. यामुळे काँग्रेसचे गोवा निवडणुकीकडे विशेष लक्ष

भारतीय जनता पक्षाने मागील गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या तोंडातील घास काढून घेतला होता. जास्त आमदार असूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नव्हती. यामुळे कॉंग्रेसने यावेळी गोव्याकडे विशेष लक्ष केंद्रित केला आहे. आगामी काळात उत्तर प्रदेश व गोवामध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. आता शिवसेनेकडूनही या निवडणुकांसाठी काँग्रेसशी हातमिळणी करण्याचे संकेत देण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह आहेत.

प्रियांका गांधी व खासदार संजय राऊत यांच्या बैठकीनंतर युपीएत सहभागी होणार का, असे त्यांना विचारले असता याबाबतचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतली, असे त्यांनी सांगितले होते.

गोव्यात सध्या निवडणुकांसोबत पर्यटन, फेस्टिव्हलचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावरच नवीन वर्ष, ख्रिसमस, संनबर्न सारखे कार्यक्रम होऊ घातले आहेत , यावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्य पोलिसांनी विशेष मोहीम राबविण्याचे ठरविले आहे.

हेही वाचा-उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-काँग्रेसची युती..?

Last Updated : Dec 9, 2021, 9:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.