प्रयागराज (उत्तर प्रदेश) : पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना त्यांच्याकडे बिहार आणि त्रिपुराच्या राज्यपालांचा अतिरिक्त कार्यभारही होता. डिसेंबर महिन्यात श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीवरून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तब्येत सुधारल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. (Keshari Nath Tripathi passes away) मात्र, आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांचा श्वास घेणे बंद झाले. दरम्यान, त्यांचे काही काळाने निधन झाल्याचे समोर आले. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर रसुलाबाद घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंडित केशरीनाथ त्रिपाठी प्रयागराज शहराच्या दक्षिणेकडील मतदारसंघातून आमदार होते. तसेच, त्यांनी (2004)मध्ये जौनपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूकही लढवली होती. याशिवाय ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकीलही होते. याबरोबरच, ते संविधानाचे तज्ज्ञही होते.
-
Prayagraj, Uttar Pradesh | Senior BJP leader and former speaker of UP Legislative Assembly Keshari Nath Tripathi passes away, confirms his son Neeraj Tripathi pic.twitter.com/9nFzsEwvuF
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Prayagraj, Uttar Pradesh | Senior BJP leader and former speaker of UP Legislative Assembly Keshari Nath Tripathi passes away, confirms his son Neeraj Tripathi pic.twitter.com/9nFzsEwvuF
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 8, 2023Prayagraj, Uttar Pradesh | Senior BJP leader and former speaker of UP Legislative Assembly Keshari Nath Tripathi passes away, confirms his son Neeraj Tripathi pic.twitter.com/9nFzsEwvuF
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 8, 2023
खासगी रुग्णालय : केशरीनाथ त्रिपाठी हे गेल्या वर्षी (दि. 8 डिसेंबर)रोजी बाथरूममध्ये घसरुन पडले होते. या कारणामुळे त्यांच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर झाले होते. तेव्हापासून त्यांनी खाणे-पिणे बंद केले होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. (दि. 30 डिसेंबर)रोजी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना प्रयागराज शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना घरी आणले. मात्र, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुख्यमंत्र्यांकडून शोकभावना : केशरी नाथ त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. केशरीनाथ त्रिपाठी हे ज्येष्ठ आणि अनुभवी राजकारणी होते. संसदीय नियम, परंपरा आणि कायद्याचे त्यांना सखोल ज्ञान होते. त्रिपाठी हे अभ्यासू वकील आणि संवेदनशील लेखकही होते. त्यांच्या निधनाने समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
पंडित केसरीनाथ त्रिपाठी यांच्याबद्दल : पंडित केसरीनाथ त्रिपाठी यांचा जन्म (१० नोव्हेंबर १९३४)रोजी झाला. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील असण्यासोबतच त्यांनी अनेक वर्षे उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्षपदही भूषवले. ते तीनवेळा यूपी विधानसभेचे अध्यक्ष होते. याशिवाय ते भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेश युनिटचे अध्यक्षही राहिले आहेत. पंडित केसरीनाथ त्रिपाठी हे (2014 ते 2019)पर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. त्यादरम्यान त्यांना बिहार, मेघालय आणि मिझोराम राज्यांचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला होता.