ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनप्रमाणे आरोग्य क्षेत्राने सरकारसोबत मैलाचा दगड गाठला - आदर पुनावालांची प्रतिक्रिया - adar poonawalla meeting with pm narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारातून आरोग्य सेवा उद्योगाने सरकारसोबत काम केले आणि हा मोठा टप्पा गाठला. आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली ज्यामुळे लसी उद्योगाला पुढे नेण्यास मदत होईल. जगभरात, देश आता लस निर्मितीमध्ये गुंतवणूक करणार आहेत आणि भारताला पुढे राहण्याची गरज आहे. आम्ही ते उद्योग आणि सरकारसह काम कसे करावे, याबद्दलही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

Adar poonawalla
आदर पुनावाला
author img

By

Published : Oct 23, 2021, 11:55 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनप्रमाणे आरोग्य क्षेत्राने सरकारसोबत मैलाचा दगड गाठला आहे. आम्ही पंतप्रधानांसमवेत आरोग्य क्षेत्र हे पुढे कसे नेता येईल व भविष्यात महामारीची तयारी कशी करायची याबाबत चर्चा केली आहे. आम्ही सतत क्षमता विस्तारत आहोत, अशी माहिती सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लशींच्या उत्पादकांशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांच्याशी संवाद साधला. या संवादानंतर सीरमचे आदर पुनावाला यांनी ही प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारातून आरोग्य सेवा उद्योगाने सरकारसोबत काम केले आणि हा मोठा टप्पा गाठला. आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली ज्यामुळे लसी उद्योगाला पुढे नेण्यास मदत होईल. जगभरात, देश आता लस निर्मितीमध्ये गुंतवणूक करणार आहेत आणि भारताला पुढे राहण्याची गरज आहे. आम्ही ते उद्योग आणि सरकारसह काम कसे करावे, याबद्दलही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारदेखील उपस्थित होत्या.

भारताने कोरोना लसीकरणात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लशींच्या उत्पादकांशी विविध विषयावर चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लस उत्पादकांशी लशींच्या संशोधनाबाबतही चर्चा केली. या बैठकीला सात कोरोना लस उत्पादक उपस्थित होते. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, डॉ. रेड्डीज लॅबोरटीरीज, झायडस कॅडिला, बायोलॉजीकल ई, जिनोव्हा बायोफार्मा आणि पॅनाका बायोटेकचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा - क्रिकेट आणि दहशतवादाचा खेळ एकत्र खेळला जाऊ शकत नाही - रामदेव बाबा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.