ETV Bharat / bharat

Arvind Kejriwal : केजरीवाल यांनी ५०० कोटी रुपये उभारण्यास सांगितले होते, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरचा दावा - तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरचा दावा

सुकेश चंद्रशेखर यांनी आपल्या पत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) ) आणि सत्येंद्र जैन यांच्याबद्दल अनेक दावे केले आहेत आणि 2017 मधील डिनर पार्टीचा संदर्भ देऊन निधी गोळा केल्याचाही मोठा आरोप त्यांनी केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 5, 2022, 7:39 PM IST

नवी दिल्ली : 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर यांनी दिल्लीच्या उपराज्यपालांना आणखी एक पत्र लिहून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (second letter of Sukesh Chandrashekhar) यांच्यासमोर अडचणी उभ्या उभे केल्या आहेत. शुक्रवारी सुकेशने त्याचे वकील अमित मलिक ( Advocate Amit Malik ) यांच्यामार्फत पत्रात आरोप केला आहे की, केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्या विरोधात लिहिलेल्या पहिल्या पत्रानंतर मला तिहार तुरुंगाचे माजी डीजी आणि तिहारच्या प्रशासनाकडून धमकी दिली जात आहे ( Former DG of Tihar accused of threatening ). सुकेश चंद्रशेखर यांनी आपल्या पत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Delhi Chief Minister Arvind Kejriwal ) आणि सत्येंद्र जैन यांच्याबद्दल अनेक दावे केले आहेत आणि 2017 मधील डिनर पार्टीचा संदर्भ देऊन निधी गोळा केल्याचाही मोठा आरोप त्यांनी केला आहे.

सुकेश चंद्रशेखर यांचा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरोधात अनेक दावे

मुख्यमंत्री केजरीवाल यांना प्रश्न - सुकेश ( Mahathag Sukesh Chandrashekhar ) यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की, मी केजरीवाल आणि त्यांचे मंत्री सत्येंद्र जैन यांना घाबरत नाही. मी दिलेली माहिती पूर्णपणे बरोबर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांची तपासणी करण्याची मागणी त्याने केली आहे. एलजीला लिहिलेल्या पत्रात सुकेश यांनी थेट केजरीवाल यांनाच प्रश्न केला आहे. आपल्या पत्रात सुकेश चंद्रशेखर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना उद्देशून प्रश्नार्थक स्वरात म्हटले आहे की, जर मी देशातील सर्वात मोठा गुंड आहे, तर माझ्यासारख्या गुंडाला राज्यसभेची जागा देऊ करून ५० कोटी रुपये का घेतले? अनेक उद्योगपतींना पक्षाशी जोडून तुम्ही मला ५०० कोटी रुपये जमवण्यास सांगितले होते, असा प्रश्न सुकेश यांनी केला आहे. त्या बदल्यात मला कर्नाटकात पक्षाकडून मोठ्या पदाची ऑफरही दिली जात होती.

second letter of Sukesh Chandrashekhar
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरोधात अनेक दावे

डिनर पार्टीला का उपस्थित होता - सुकेश चंद्रशेखर यांनी लिहिलेल्या चार पानी पत्रात हैदराबाद येथील हॉटेल हयात येथे झालेल्या डिनर पार्टीचा संदर्भ देत म्हटले आहे की, 2016 मध्ये मी तुम्हाला 50 कोटी रुपये दिले असताना तुम्ही माझ्या डिनर पार्टीला का उपस्थित राहिलात. सुकेश चंद्रशेखर पुढे म्हणाले की, त्या पक्षात सत्येंद्र जैनही तुमच्यासोबत होते. हे पैसे मी तुम्हाला कैलाश गेहलोत यांच्या असोला फार्ममध्ये दिले आहेत. केजरीवालजी, 2017 साली जेव्हा मी तिहार तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याशी सत्येंद्र जैन यांच्या काळ्या रंगाच्या आयफोनवरून का बोललात? हा नंबर सत्येंद्र जैन यांनी AK2 च्या नावाने सेव्ह केल्याचा दावा महाथुगने केला आहे.

भाजप नेत्यांचा हल्लाबोल - सुकेशच्या या खळबळजनक पत्रानंतर भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. कपिल मिश्रा यांनी लिहिले आहे की, "सुकेश चंद्रशेखर यांनी खुलासा केला आहे की, केजरीवाल स्वत: त्यांना भेटले होते आणि त्यांना कैलाश गेहलोत यांच्या फार्म हाऊसमध्ये 50 कोटी रुपये देण्यात आले होते. केजरीवाल जर गुंडांकडून पैसे घेऊ शकतात, तर केजरीवाल दहशतवादी आणि दुश्मनांसोबत पण व्यवहार करत असतील. हा केवळ भ्रष्टाचार नाही तर देशासोबत केलाला धोखा आहे.

तिहार तुरूंगाच्या महासंचालकांची उचलबांगडी - दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयाने तुरुंगात बंद असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना दिलेल्या सुविधांबाबत अहवाल मागवला होता. मंत्रालयाने दिल्ली सरकारच्या मुख्य सचिवांकडून हा अहवाल मागवला आहे. अलीकडेच ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) न्यायालयाला सांगितले की, सत्येंद्र जैन आपल्या प्रभावाचा वापर करून तुरुंगातील सुविधा घेत आहेत, त्यांना सुविधाही पुरवल्या जात आहेत. ईडीने न्यायालयाला सांगितले होते की तिहार तुरुंगात मंत्री सत्येंद्र जैन यांना केवळ डोक्याची मसाजच दिली जात नाही, तर त्यांना वेळोवेळी पायाची मालिश आणि पाठीचा मसाज यांसारख्या सुविधाही दिल्या जात आहेत. याप्रकरणी तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांची शुक्रवारी तेथून उचलबांगडी करण्यात आली आहे.

10 कोटी रूपये दिले - ईडीने एक व्हिडिओही कोर्टाला दिल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ फुटेज सादर करताना, ईडीने जेलच्या नियमावलीचे उल्लंघन करून सत्येंद्र जैन यांच्यासोबतची बैठक शिथिल केल्याचा आरोपही तुरुंग अधीक्षकांवर केला आहे. ठग सुकेश चंद्रशेखर यांनी दावा केला आहे की, मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात बंद असलेले मंत्री सत्येंद्र जैन यांना आपण नेते सत्येंद्र जैन यांना संरक्षण रक्कम म्हणून 10 कोटी रुपये दिले आहेत. सुकेशचे वकील ए के सिंग यांनी याला दुजोरा दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.