दक्षिण कश्मीर : दक्षिण काश्मीरमधील ( South Kashmir ) शोपियान जिल्ह्यातील मूलू भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे असे पोलिसांनी बुधवारी सांगितले. शोपियांमध्ये 12 तासांमध्ये ही दुसरी चकमक ( Second Encounter In JK Shopian ) आहे. शोपियानमधील द्राच भागात आधीच चकमक सुरू आहे. पोलीस आणि सुरक्षा दल कामावर आहेत. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाला या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर चकमक सुरू झाली.
चकमकीत तीन दहशतवादी ठार : सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातल्यानंतर तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. अलिकडच्या काळात संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी झाल्या आहेत ज्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील बास्कुचन भागात रविवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाला.