ETV Bharat / bharat

Scoot Airline News : सिंगापूरला जाणारे विमान ३५ प्रवाशांना चुकवून अमृतसर विमानतळावरून रवाना; डीजीसीएचे चौकशीचे आदेश - प्रवासी अमृतसर विमानतळावर

स्कूट एअरलाईनचे सिंगापूरला जाणारे विमान त्यांनी बदललेल्या नियोजित वेळेत निघाले. मात्र बदललेली वेळ मेलद्वारे कळवूनही संबंधित मेल न पाहिल्याने 30हून अधिक प्रवाशांचे विमान चुकले. आता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश डीजीसीएने दिले आहेत.

Scoot Airline
सिंगापूरला जाणारे विमान ३५ प्रवाशांशिवाय अमृतसर विमानतळावरून रवाना
author img

By

Published : Jan 19, 2023, 5:30 PM IST

नवी दिल्ली : अमृतसर विमानतळावर 35 प्रवाशांना मागे ठेवून सिंगापूरला जाणारे विमान निघून कसे गेले याची चौकशी करण्याचे आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिले आहेत. बुधवारी संध्याकाळी ७.५५ वाजता अमृतसर विमानतळावरून विमान निघणार होते. मात्र स्कूट एअरलाइनच्या फ्लाइटने त्याच्या सुटण्याच्या वेळेच्या काही तास आधी दुपारी ३ वाजता उड्डाण केले. आता उड्डाण नियामक प्राधिकरणाने चौकशी सुरू केली.

30 हून अधिक प्रवासी मागे : विमानतळावर गोंधळ उडाला आणि संतप्त प्रवाशांनी आंदोलन केले. त्यांनी विमानतळावरील संबंधित अधिकाऱ्यांकडे आपली तक्रार केली. विमानतळ अधिकाऱ्यांनी एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर प्रवाशांना ई मेलद्वारे फ्लाइटच्या वेळेत बदल करण्यात आल्याची माहिती दिली होती, असे सांगितले. अमृतसर विमानतळ संचालकांनी सांगितले की, सुमारे 280 प्रवासी सिंगापूरला जाणार होते. परंतु 30 हून अधिक प्रवासी मागे ठेवून 253 प्रवाशांना घेऊन विमानाने उड्डाण केले.

एअरलाइनने केली त्यांची फ्लाइट तिकिटे रद्द : डीजीसीएने स्कूट एअरलाइन, सिंगापूर-आधारित कमी किमतीची एअरलाइन आणि सिंगापूर एअरलाइन्सची पूर्ण मालकीची उपकंपनी आणि अमृतसर विमानतळ प्राधिकरण या दोघांकडून तपशील मागवला आहे. एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, सर्व प्रवाशांना वेळेत बदल झाल्याची माहिती ईमेलद्वारे देण्यात आली होती. विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रॅव्हल एजंट, ज्याने एका गटातील 30 लोकांसाठी तिकिटे बुक केली होती. त्यांनी प्रवाशांना फ्लाइटच्या वेळेत झालेल्या बदलाची माहिती दिली नाही. ज्यामुळे एअरलाइनने त्यांची फ्लाइट तिकिटे रद्द केली.

बेंगळुरू विमानतळावरून अशीच घटना उघडकीस : बेंगळुरू विमानतळावरून नुकतीच अशीच एक घटना उघडकीस आली. गो फस्टच्या दिल्लीला जाणार्‍या फ्लाइटने शटल बसमधून फ्लाइटला जात असलेल्या 55 प्रवाशांना मागे सोडले होते. मागे राहिलेल्या प्रवाशांना चार तासांनंतर दुसऱ्या फ्लाइटमध्ये बसवण्यात आले. डीडीसीएने गो फस्ट एअरलाइन्सच्या मुख्य ऑपरेटिंग ऑफिसरला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

हेही वाचा : Starlink in Flight : JSX जेटवर स्टारलिंक इन-फ्लाइट इंटरनेटने केले टेक ऑफ; एलोन मस्क यांच्या कंपनीकडून घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.