ETV Bharat / bharat

Violence in Palamu : शाळेत सुरू होती प्रार्थना अन् बाहेर हिंसाचार ; पलामू हिंसाचारात अडकलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पोहोचवले घरी

दोन गट आपसात भिडल्याने बुधवारी पलामूत हिंसाचार उफाळून आला. या हिंसाचाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. पलामू हिंसाचारात शालेय विद्यार्थी अडकल्याने त्यांना प्रशासनाने पोलिसांच्या निगराणीत त्यांच्या घरी सोडले.

Violence in Palamu
पलामूत बंदोबस्तासाठी पोलीस तैनात केले आहेत
author img

By

Published : Feb 15, 2023, 6:50 PM IST

पलामू : पांकी येथे झालेल्या हिंसाचाराने देशभर खळबळ उडाली आहे. या हिंसाचारात 150 शालेय विद्यार्थी अनेक तास अडकल्याने चांगलीच खळबळ उडाली. या शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या निगराणीत घरी पोहोचवण्यात आले. पोलिसांच्या निगराणीत या शालेय विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला आहे. हे सगळे विद्यार्थी पलामू आणि त्याच्या आसपासच्या गावातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन गटातील कार्यकर्ते बुधवारी आपसात भिडल्याने पलामूत हिंसाचार उफाळून आला होता.

शाळेत सुरू होती प्रार्थना अन् बाहेर हिंसाचार : पलामू परिसरात बुधवारी दोन गट आपसात भिडल्याने चांगलाच हिंसाचार उफाळून आला. यावेळी ब्राईट फ्युचर स्कूल आणि शिक्षा निकेतन या दोन्ही शाळेत प्रार्थना सुरू होती. त्यामुळे शाळेतील मुले एकाच जागेवर स्तब्ध उभे होते. त्यामुळे त्यांना तात्काळ बाहेर पडता आले नाही. शाळेच्या प्राचार्यांनी तात्काळ शाळेचे दरवाजे बंद केल्यामुळे मुले शाळेच सुरक्षित होते. त्यातही जे जवळचे पालक होते, त्यांनी आपल्या पाल्यांना घेऊन घर जवळ केले. मात्र जे विद्यार्थी इतर लांबच्या गावातून आले होते, ते मात्र शाळेतच अडकून पडले.

हिंसाचारामुळे घाबरले विद्यार्थी : पलामू हिंसाचारामुळे ब्राइट फ्यूचर स्कूल आणि शिक्षा निकेतन या दोन्ही शाळेतील 150 शालेय विद्यार्थी शाळेतच अडकून पडले. त्यामुळे या शाळेच्या प्राचार्यांनी या विद्यार्थ्यांना शाळेतील एका खोलीत बंद केले होते. ब्राईट फ्युचर शाळेचे संचालक मोहम्मतौफिक अंसारी यांनी हे सगळे विद्यार्थी प्रचंड घाबरल्याची माहिती दिली. या विद्यार्थ्यांना एका खोलीत ठेवल्याने त्यांना धिर देत खाण्याच्या वस्तू देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

प्रशासनाने पोलिसांच्या निरगाणीत सोडले घरी : पलामू हिंसाचारामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे शालेय विद्यार्थी शाळेतच अडकून पडले. याबाबत शिक्षा निकेतन शाळेचे प्राचार्य विनोद सिंह यांनी हे विद्यार्थी प्रचंड घाबरलेले होते. त्यांना धिर दिल्यामुळे ते शाळेतच सुरक्षित होते. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे प्रशासनाने या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या निगराणीखाली त्यांच्या घरी सुखरुप सोडल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळी आठपासून तीनपर्यंत अडकले विद्यार्थी : सरकारी शाळेतील विद्यार्थी सकाळीच घरी सोडण्यात आले होते. मात्र खासगी शाळेतील विद्यार्थी सकाळी आठ वाजता आल्यानंतर दुपारी तीनवाजतापर्यंत शाळेतच अडकून पडले होते. मात्र हिंसाचार करणाऱ्यांनी शाळेवर दगडफेक केले नसल्याची माहिती यावेळी शिक्षा निकेतनच्या प्राचार्यांनी दिली. प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलिसांना शाळेभोवती तैनात केले होते, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

हेही वाचा - Grandmother Donate Kidney : आजी ठरली देवदूत; 73 वर्षाच्या आजीने 21 वर्षीय नातवाला किडनी दान करुन दिले जीवनदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.