ETV Bharat / bharat

शाही ईदगाह मशिदीची पाहणी आयुक्तांमार्फत होणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती

Shahi Idgah Masjid Dispute: मथुरेतील कृष्णजन्मभूमी-शाही ईदगाह संकुलाची पाहणी करण्यासाठी आयुक्त नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं आज मंगळवार (16 जानेवारी 2024) रोजी स्थगिती दिलीय. शाही ईदगाह मशीद संकुलात कोणतंही सर्वेक्षण होणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलय. उच्च न्यायालयात कारवाई सुरू राहील. परंतु, न्यायालयाची आयुक्तांच्या नियुक्तीवर अंतरिम स्थगिती असेल असंही न्यायालयानं स्पष्ट केलय.

SC stays Allahabad High Cour
शाही ईदगाह
author img

By ANI

Published : Jan 16, 2024, 2:47 PM IST

नवी दिल्ली : Shahi Idgah Masjid Dispute : सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील मथुरा येथील शाही मशिदीच्या (वादग्रस्त परिसर) सर्वेक्षणाच्या आदेशाला स्थगिती दिलीय. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की, याचिका कायम ठेवण्याविरुद्ध उच्च न्यायालयाने मशिदीच्या बाजूच्या याचिकेवर सुनावणी करावी. परंतु, न्यायालय आयुक्तांच्या नियुक्तीवर अंतरिम स्थगिती असेल. सर्वेक्षणाशी संबंधित आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले होते. तर, शाही ईदगाह समितीने मथुरा जिल्हा न्यायालयातून सर्व प्रकरणे उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यास विरोध केला आहे. या मुद्द्यावर पुढील सुनावणी आता 23 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय काय होता : अलाहाबाद उच्च न्यायालयाने 14 डिसेंबर 2023 रोजी मथुरेच्या श्री कृष्ण जन्मभूमी मंदिर प्रकरणी आपला निर्णय दिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर आणि शाही इदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेवर सर्वेक्षण करण्यास मान्यता दिली होती. वादग्रस्त जमिनीचं सर्वेक्षण वकिलांच्या माध्यमातून करून घेण्याची मागणीही न्यायालयाने मान्य केली होती. आपल्या निर्णयात न्यायालयाने ज्ञानवापी वादाच्या धर्तीवर मथुरेतील वादग्रस्त जागेचे अधिवक्ता आयुक्तांमार्फत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.

उच्च न्यायालयात याचिका कोणी दाखल केली : ही याचिका भगवान श्री कृष्ण विराजमान आणि इतर सात जणांनी दाखल केली होती. हरिशंकर जैन, विष्णू शंकर जैन, प्रभा पांडे आणि देवकी नंदन यांच्यामार्फत दाखल केली होती. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे, की त्या मशिदीच्या खाली भगवान कृष्णाचं जन्मस्थान आहे. तसंच, काही संकेत आहेत जे सांगतात की येथे मंदिर आहे. हिंदू बाजूचे वकील विष्णू शंकर जैन यांच्या म्हणण्यानुसार, उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, हिंदू मंदिरांचे वैशिष्ट्य असलेल्या कमळाच्या आकाराचा स्तंभ आहे.

हेही वाचा :

1 राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा ; 'मैसूरच्या वाघा'नं बनवलेली 'राम लल्लां'ची मूर्ती, अयोध्येत होणार विराजमान

2 शेतकरी आंदोलन पुन्हा सुरू होणार, 26 जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा

3 जगातील सर्वात श्रीमंत यूट्यूबरचा 'एक्स'वर पहिला व्हिडिओ अपलोड, एलॉन मस्क यूट्यूबला देणार टक्कर?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.