नवी दिल्ली SC Dismissed Accused Appeal : जादू टोणा केल्याच्या संशयातून महिलेचा खून केल्याची घटना पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात 1993 मध्ये घडली होती. या खून प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयानं आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. 15 वर्ष शिक्षा भोगल्याचं कारण देत या आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) जन्मठेप रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अभय एस ओक आणि न्यायमूर्ती पंकज मिथल यांच्या खंडपीठानं हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय : पुरुलिया इथं झालेल्या महिलेच्या खून प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयानं पाच आरोपींना दोषी ठरवलं होतं. त्यामुळे साक्षीदारांच्या साक्षी आणि पुराव्यात कोणतीही कमतरता नसल्याचं सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अभय एस ओक आणि न्यायमूर्ती पंकज मिथल यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. ट्रायल कोर्टानंही आरोपींना दिलेल्या शिक्षेत कोणतीही चूक नसल्याचं या खंडपीठानं सांगितलं. महिलेला फक्त धडा शिकवण्यासाठी मारहाण केली, या आरोपीच्या दाव्याला मात्र न्यायालयानं फेटाळून लावलं. महिलेच्या डोक्यावर झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची होती. त्यामुळे तिला फक्त दुखापत करणं हा आरोपीचा हेतू नसल्याचंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं.
काय केला होता आरोपींनी दावा : पुरुलिया इथं जादू टोणा करत असल्याच्या कारणावरुन महिलेचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयानं या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यानंतर या आरोपींनी कोलकाता उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली. मात्र कोलकाता उच्च न्यायालयानं या आरोपींची जन्मठेप कायम ठेवली. त्यामुळे या खून प्रकरणातील दोन आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत 15 पूर्ण केल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली. या सुनावणीत आम्ही फक्त महिलेला पुन्हा जादूटोणा न करण्यासाठी दुखापत करत होतो, असा दावा या आरोपींनी केला. या महिलेला ठार मारण्याचा आमचा हेतू नव्हता, असंही यावेळी या आरोपींच्या वतीनं दावा करण्यात आला.
काय होते खून प्रकरण : पश्चिम बंगालमधील पुरुलिया इथं सप्टेंबर 1993 मधील महिन्यात मृत महिला ही तिच्या सुनेविषयी तलावातून स्नान करुन परत येत होती. यावेळी पाच आरोपींनी या महिलेवर हल्ला केला. या महिलेच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानं तिचा मृत्यू झाला होता. या आरोपींचं या महिलेसोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. या महिलेला या आरोपींनी डायन म्हणून संबोधल्याची साक्ष या प्रकरणातील साक्षिदारानं दिली होती. त्यामुळे न्यायालयानं ही साक्ष महत्वपूर्ण मानली. मात्र 15 वर्ष शिक्षा भोगल्यामुळे आता जन्मठेप रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र नोव्हेंबर 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं सुरेंद्र गोरेन, रणजीत गोराई आणि राजेन गोरेन या तीन दोषींचं अपील फेटाळलं होतं.
हेही वाचा :