ETV Bharat / bharat

Save From First Salary : भारतीय तरुण बचतीबाबत आहेत निष्काळजी ; पहिल्या पगारापासून 'अशी' करायला हवी बचत - पगार

भारतीय तरुण बचत करण्यात मोठा निष्काळजीपणा करत असल्याचे मत आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे तरुणांनी पहिल्या पगारापासून बचतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे.

Save From First Salary
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 5, 2023, 5:01 PM IST

हैदराबाद : तरुणपणात उत्पन्न कमी असले, तरी जबाबदाऱ्या जास्त नसतात. त्यामुळे तरुणांनी खर्च मर्यादित ठेऊन भविष्याचा विचार करत आर्थिक योजना बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच तुमचा पैसा कठीण काळात तुमच्या उपयोगी येऊ शकतो. त्यातून संपत्ती निर्माण होऊ शकते. यासाठी कोणती रणनीती अवलंबून बचत करायची त्याबाबतची माहिती घेऊया या लेखातून.

तरुणांनी शिकायला हवे मनी मॅनेजमेंट : भारत हा तरुणांचा देश असून 35 वर्षाखालील 65 टक्के तरुणांची संख्या देशात आहे. मात्र तरीही या तरुणांना आर्थिक नियोजनाची चिंता नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तरुणांनी चांगल्या सवयी लवकरात लवकर आत्मसात करण्याची गरज आहे. मनी मॅनेजमेंट हे त्यापैकीच एक वेगळा विषय असल्याचेही तरुणांनी ओळखायला हवे. शिकताना आपण पालकांवर अवलंबून असतो. पण एकदा का आपण कमावायला सुरुवात केली, तर कमावलेला प्रत्येक रुपया खर्च करण्यापूर्वी नीट विचार करण्याची गरज असल्याचेही आर्थिक तज्ज्ञ स्पष्ट करतात.

पहिल्या पगारापासून करा बचत : तरुणांना पहिल्या पगारापासून बचत करण्याची गरज असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे तरुणांनी पहिल्या पगारापासून बचत करण्यासाठी 50:50 या तत्त्वाचा अंगिकार करण्याचेही तज्ज्ञांच्या वतीने स्पष्ट करण्यात येते. तरुणांनी उत्पन्नाच्या 50 टक्के रक्कम बचतीसाठी बाजूला काढून ठेवण्याची गरज आहे. तरुणांचा अर्धा पगार आधी विविध योजनांमध्ये गुंतवण्याचा सल्लाही तज्ज्ञांकडून देण्यात येतो. त्यामुळे तरुणांकडे काही पैसे जमा राहील. तरुणांना आर्थिक उद्दिष्टे आणि तबचतीचे महत्व समजल्यानंतरच उच्च परताव्याच्या योजना आपण समजून घेऊ शकत असल्याचे मतही आर्थिक तज्ज्ञ व्यक्त करतात.

तरुणांनी आर्थिक उद्दिष्ट स्पष्ट करण्याची गरज : तरुणांनी आपले आर्थिक उद्दिष्टे स्पष्ट करणे गरजेचे आहे. एखादी गुंतवणूक विशिष्ट उद्दिष्टाशी जोडलेली असल्यानंतरच ती दीर्घकाळ टिकते. नाहीतर मधेच सुरुवात करुन थांबायची सवय होऊन जाते. त्यामुळे अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे तरुणांना ओळखता यायला हवी. ते उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य गुंतवणुकीचा मार्ग निवडून गुंतवणूक सुरू करण्याची गरज असल्याचे मतही या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. अनेकजण गरजेनुसार रोखीत रूपांतरित होणाऱ्या योजनांची निवड करण्यास प्राधान्य देतात. मात्र हे अल्पकालीन उद्दिष्टांसाठी योग्य असल्याचे मतही तज्ज्ञ व्यक्त करतात.

तरुण घेऊ शकतात कौटुंबिक जबाबदारी : कौटुंबिक जबाबदाऱ्या नसणारे तरुण काहीवेळा कुटुंबाचे कमावणारे बनू शकतात. सेवानिवृत्त पालक आणि भावंडे तुमच्यावर अवलंबून असू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी विमा पॉलिसी घेण्याचा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञ देतात. विमा हे कुटुंबासाठी एक संरक्षणात्मक कवच आहे. त्यामुळे तरुण वयात विमा पॉलिसी घेतल्यास प्रीमियम कमी असेल. त्यासह त्याचा परतावाही चांगला मिळू शकत असल्याचे आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ स्पष्ट करतात.

तरुणांकडे हवा दीर्घकालीन दृष्टिकोन : आर्थिक नियोजन एका दिवसात होत नाही. उपलब्ध संसाधने किती कार्यक्षमतेने वापरली जातात, त्यावरुन ते ठरवले जाते. तरुणांचे लग्न, मुले, अभ्यास, इतर गरजा, निवृत्ती याकडे तरुणांचा दीर्घकालीन दृष्टिकोन असायला हवा. 30 ते 40 वर्षांची कमाईतून काही बचत करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे असल्याचे मतही या क्षेत्रातील दिग्गज व्यक्त करतात. त्यामुळे योग्य बचत करुन भविष्य सुरक्षित करता येते, काही अडचण असल्यास असल्यास आर्थिक तज्ञांचा सल्ला घेण्यात यावा, असेही तज्ज्ञ व्यक्त करतात.

हेही वाचा - Cool Roof Policy In Telangana : आला उन्हाळा, घर संभाळा ; तेलंगाणाने लाँच केली कूल रूफ पॉलिसी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.