ETV Bharat / bharat

Sarpa App : सापांना जीवदान देण्यासाठी आता 'सर्प अ‍ॅप' मदतीला; राज्य सरकारच्या वन विभागाचा निर्णय - केरळ सरकार सर्प अ‍ॅप लाँच

केरळ सरकारच्या वन विभागाने (Kerala Government Forest Department) लोकांना त्यांच्या परिसरातून सापांची सुटका करण्यासाठी तसेच (Sarpa App Kerala) सापांची मदत करण्यासाठी 'सर्प' अ‍ॅप लाँच केले आहे. जर एखाद्याला त्यांच्या परिसरात साप दिसला तर त्यांना फक्त सापाचे छायाचित्र क्लिक करावे लागेल आणि ते अ‍ॅपमध्ये अपलोड करावे लागेल.

Sarpa app
सर्प अ‍ॅप
author img

By

Published : Nov 5, 2022, 8:10 PM IST

मलप्पुरम(केरळ) : केरळ सरकारच्या वन विभागाने (Kerala Government Forest Department) लोकांना त्यांच्या परिसरातून सापांची सुटका करण्यासाठी तसेच (Sarpa App Kerala) सापांची मदत करण्यासाठी 'सर्प' अ‍ॅप लाँच केले आहे. जर एखाद्याला त्यांच्या परिसरात साप दिसला तर त्यांना फक्त सापाचे छायाचित्र क्लिक करावे लागेल आणि ते अ‍ॅपमध्ये अपलोड करावे लागेल. त्यानंतर जवळच्या परिसरातील एक सर्पमित्र घटनास्थळी धाव घेईल आणि सापाची सुटका करेल असा यामागचा उद्देश असल्याचे केरळ सरकराने सांगितले आहे. यामुळे सापांची सुखरुप सुटका होण्यास मदत होणार आहे. हे अ‍ॅप प्ले स्टोरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

काय आहे या अ‍ॅपचा उद्देश - या अ‍ॅपचा उद्देश लोकांकडून भीतीमुळे साप मारण्याची शक्यता कमी करणे आणि लोकांना विविध विषारी साप, त्यांचे वर्तन आणि एखाद्याला साप चावल्यास प्रथमोपचार करण्याबाबत मदत करणे हे आहे. केरळ राज्यात हे अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, केरळात साप मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे लोकं भीतीमुळे त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. यामुळे सापांची संख्या कमी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच जनजागृती आणि सापांची माहिती मिळण्यासाठी सरकारने हे अ‍ॅप तयार केले आहे.

अ‍ॅप कसे काम करेल - राज्यभरात वनविभागाकडे सर्प रेस्क्यूर्सचे विस्तृत जाळे असून, त्यांना वनविभागाने प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे फोटो अपलोड केल्यावर अ‍ॅप GPS लोकेशन दर्शवेल आणि तो संदेश जवळच्या सर्पमित्राला पाठवला जाईल. यानंतर तो सर्पमित्र त्या घटनास्थळी जाऊन त्या सापाला जीवदान देईल. अशा पद्धतीने हे अ‍ॅप काम करणार आहे. या अ‍ॅपमध्ये सापांना वाचवणाऱ्या सर्पमित्राचा मोबाईल नंबरची यादी देखील देण्यात आली आहे. तसेच एखादा फोटो क्लिक करू शकला नसला तरी त्यांच्या परिसरात साप दिसला असेल तर ते संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून बचावाची विनंती करू शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.