वाराणसी Ram Mandir Holiday : अयोध्येतील भव्य राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. या दिवशी होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. सुमारे १० दिवस आधीपासून कार्यक्रम सुरू होतील.
कोणी केली मागणी : २२ जानेवारीला मंदिर उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे हा दिवस सर्व साधू-संतांसाठी खास असेल. मात्र या दिवशी सरकारी कार्यालयांपासून ते खासगी कार्यालयं, दुकानं आणि बाजारपेठा सर्व काही खुलं राहणार आहे. अशा परिस्थितीत लोक हा उत्सव कसा साजरा करतील, याचा विचार करून संत समाजानं शासनाकडे या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. वाराणसीतील अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी २२ जानेवारी हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करावा, असं आवाहन सरकारला केलंय.
दिवाळीसारखा उत्सव साजरा करा : याबाबत बोलताना स्वामी जितेंद्रानंद सरस्वती म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ४९५ वर्षांनी भगवान श्रीरामाची जन्मभूमी मुक्त झाली. मात्र तरीही धार्मिक सलोखा बिघडू नये याचा विचार करून आम्ही मोठा आनंद साजरा करू शकलो नाही. परंतु आता जेव्हा मंदिराचं बांधकाम पूर्ण होऊन रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे, तेव्हा अशा प्रसंगी संपूर्ण देशातील प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक घराला सजवून दिवाळीसारखा उत्सव साजरा करणं योग्य आहे, असं ते म्हणाले.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुट्टीची मागणी : रामलल्ला ४९५ वर्षांनंतर श्रीराम जन्मभूमीत येत आहे. त्यामुळे हा उत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला एक दिवस सुट्टी हवी आहे. समाज उत्सव साजरा करेल. परंतु सरकारी कर्मचाऱ्यांचं काय? ते हा उत्सव कसा साजरा करतील? जेव्हा मंदिराच्या आत भगवान रामलल्लाची प्रार्थना सुरू होईल तेव्हा हा संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी आणि आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी नक्कीच सुट्टी लागेल. अशा परिस्थितीत रजा घ्यावी लागेल. त्यामुळे भारत सरकारनं २२ जानेवारी २०२४ ला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी केली आहे.
हे वाचलंत का :