ETV Bharat / bharat

Sant Kalicharan Troubles Increased : कालिचरण महाराजांना अटक करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे पथक रायपूरमध्ये - रायपूर धर्म संसद

रायपूर धर्म संसदेत ( Raipur Dharma Sansad ) महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्य ( Kalicharan Controversial statement on Mahatma Gandhi ) केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्या अडचणीत वाढ ( Troubles of Sant Kalicharan ) झाली आहे. कालीचरण महाराजांना रायपूरहून महाराष्ट्रात घेऊन महाराष्ट्र पोलिसांचे ( Maharashtra Police ) पथक रायपूरमध्ये आले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्यांचा ताबा मिळविण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांच्या अर्जावरील निर्णय सोमवारपर्यंत राखून ठेवला आहे.

कालिचरण महाराजांना अटक करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे पथक रायपूरमध्ये

author img

By

Published : Jan 2, 2022, 7:59 PM IST

रायपूर : रायपूर धर्म संसदेत ( Raipur Dharma Sansad ) महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्य ( Kalicharan Controversial statement on Mahatma Gandhi) केल्याप्रकरणी कालिचरण महाराज यांच्या अडचणीत वाढ होत ( Troubles of Sant Kalicharan ) आहे. कालीचरण यांना महाराष्ट्रात नेण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे ( Maharashtra Police ) पथक रायपूरला पोहोचले आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी न्यायालयात याचिका दाखल केली

महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने प्रोटेक्शन वॉरंटसाठी न्यायालयात अर्ज केला आहे. महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातील खजुराहो येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना रायपूर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने कालीचरण यांना १३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सोमवारी ३ जानेवारी रोजी सत्र न्यायालयात कालीचरण यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. कालीचरण यांच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. प्रथम श्रेणी न्यायाधीश निधी शर्मा यांच्या न्यायालयात, महाराष्ट्र पोलिसांनी प्रोटेक्शन वॉरंटसाठी अर्ज ( Maharashtra Police Came Raipur to arrest Sant Kalicharan ) केला आहे. कालीचरण यांच्याबाबत महाराष्ट्र पोलिसांच्या प्रोटेक्शन वॉरंटच्या अर्जावर न्यायालयाने सोमवारपर्यंत निकाल राखून ठेवला आहे. रविवारी रिमांड कोर्ट बंद होते. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना प्रोटेक्शन वॉरंट मिळालेले नाही. सोमवारी महाराष्ट्र पोलिस पुन्हा नियमित न्यायालयात अर्ज करणार आहेत.

१९ डिसेंबरला केले होते प्रक्षोभक वक्तव्य

महाराष्ट्रातील खरक परिसरात कालीचरण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 डिसेंबर रोजी खरक येथे हिंदू आघाडीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 21 डिसेंबर रोजी खरक पोलिस ठाण्यात कालीचरणसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून कालीचरण फरार होते. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस कालीचरण यांना रायपूरहून महाराष्ट्रात नेण्यासाठी आले आहेत. अकोला पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा शून्य एफआयआर केल्यानंतर रायपूरच्या टिकरापारा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कालिचरण यांच्यासह ६ जणांवर आहे गुन्हा दाखल

  • मिलिंद रामाकांत एकबोटे
  • मोहन राव शेटे
  • दीपक बाबूराव नागपुरे
  • कॅप्टन डीगेंद्र कुमार
  • नंदकिशोर रमाकांत एकबोटे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.