रायपूर - धर्म संसदेत (Raipur Dharma Sansad 2021) रविवारी मोठा वाद निर्माण झाला. महाराष्ट्रातून आलेले संत कालीचरण यांनी व्यासपीठावरून बोलताना महात्मा गांधी (Father of the Nation Mahatma Gandhi) यांच्याबद्दल वादग्रस्त (controversial statement on Mahatma Gandhi in Dharmasansad) विधान केले. १९४७ मध्ये झालेल्या भारताच्या फाळणीला त्यांनी महात्मा गांधी जबाबदार असल्याचे म्हटले.
कालीचरण (Mahant Ramsundar Das Chairman of State Gauseva Commission) म्हणाले, की महात्मा गांधी यांनी देशाचा सत्यानाश केला. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंना कालीचरण यांनी प्रणाम म्हटले. त्यामुळे धर्मसंसदेत मोठा गोंधळ उडाला. कार्यक्रमाचे मुख्य संरक्षक आणि राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष महंत रामसुंदर दास (Mahant Ramsunder Das ) हे कालीचरण यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत कार्यक्रम सोडून गेले.
कालीचरण काय म्हणाले?
धर्मसंसदेत कालीचरण यांनी नथुराम गोडसेच्या फोटोला हात जोडून नमस्कार केला. त्यांनी जाहीरपणे म्हटले, की खासदार, आमदार, मंत्री आणि पंतप्रधान यांनी कट्टर हिंदुत्ववादी होण्याची गरज आहे. मतदान करणाऱ्या लोकांवरही त्यांनी यावेळी टीका केली. धर्मांतरण रोखण्यासाठी जातिव्यवस्था रद्द करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
महंत रामसुंदर दास यांनी कालीचरण यांच्या वक्तव्यावर घेतला आक्षेप
राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष महंत रामसुंदर दास (Mahant Ramsundar Das) म्हणाले, की पुढील वर्षी होणाऱ्या धर्म संसदेत सहभागी होणार नाही. व्यासपीठावरून महात्मा गांधी यांच्याबद्दल तिरस्कारजन्य विधाने करण्यात आली आहे. त्याला आमचा विरोध आहे. यावेळी संतापलेले महंत रामसुंदर दास हे कार्यक्रमातून बाहेर पडले. व्यासपीठावरून महात्मा गांधी यांना शिवीगाळ केली आहे. त्याला मी विरोध करत आहे. हा सनातन धर्म नाही.
हेही वाचा-Covaxin for Children : कोव्हॅक्सिन १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना देता येणार, डीसीजीआयची मंजुरी
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी टाळला कार्यक्रम
मुख्यमंत्री भूपेश बघेल हे धर्मसंसदेत सहभागी होणार होते. मात्र, कालीचरण यांच्या वादग्रस्त विधानानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला येण्याचे टाळले.
व्यासपीठावर भाजप आणि काँग्रेसचे नेते होते उपस्थित
महात्मा गांधी यांच्याविरोधात अपशब्द काढण्यात आले असताना व्यासपीठावर काँग्रेसचे नेते प्रमोद दुबे, भाजपचे नेता सच्चिदानंद उपासने आणि नंदकुमार साय हेदेखील उपस्थित होते. मात्र, त्यांनी कालीचरण यांच्या वक्तव्यावर कोणथाही आक्षेप घेतला नाही.