नवी दिल्ली : दिल्लीमध्ये आप आणि भाजपमध्ये साटलोट झाल्याची शंका खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. गुजरातचा निकाल अपेक्षित आहे. सर्वांनी एकत्र लढल्यास गुजरातमध्येही परिवर्तन शक्य आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची चांगली कामगिरी केली आहे. शिवसेनेने कधी भडकाविले नाही. छत्रपती शिवरायांचा अपमान होत आहे. त्याविरोधात आवाज उठविल्यास भडकावणे आहे का? भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. सीमावादावर कठोर भूमिका घ्या म्हणजे भडकाविणे आहे का? असा सवाल शिवसेनेचे नेते ( ठाकरे गट) संजय राऊत यांनी केला. ते ( Sanjay Raut slammed Chhatrapati Shivaji remark ) माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, संजय राऊत यांनी भडकाविणे थांबवावे, असे वक्तव्य राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते.
27 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सरकार: गुजरातसह हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ चा निकालाचा दिवस आहे. यावेळी गुजरात निवडणुकीत आम आदमी पक्षाने लढत रंजक केली. मतमोजणीत भाजप आघाडीवर आहे. गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. यासह महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न देखील दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. यावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. तर, कर्नाटक मधील संघटनांकडून खासदार संजय राऊत यांना सातत्याने धमक्या येत आहेत. या सर्व विषयांवर खासदार संजय राऊत यांनी आपल्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला.
दिल्ली तुम्ही घ्या गुजरात आम्हाला सोडा: यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "महत्व पूर्व निवडणुका झाल्या आहेत. दिल्ली पालिकेतली १५ वर्षाची सत्ता भाजप कडून खेचून घेणे दिल्लीतून हे सोपे नाही. गुजरातचा निकाल अपेक्षित आहे. तिकडे जरी आप आणि अन्य पक्ष एकत्र आले असते तर निकाल वेगळा असता. त्याला आपण काटे की टक्कर असे म्हटले असते. पण, बहुतेक दिल्ली तुम्ही घ्या गुजरात आम्हाला सोडा असं काहीतरी झालं असावं, अशी लोकांना शंका आहे.
सर्वांनी एकत्र यावं, तरच विजय शक्य: हिमाचलमध्ये काँग्रेसने चांगलीच लढत दिली आहे. आणि ते चित्र अशादाही आहे. दिल्ली हातून गेला हिमाचलमध्ये संघर्ष करावा लागतो पण काँग्रेस जिंकेल. गुजरात दिल्ली बाबत त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. निवडणुकीचे आशादायी चित्र आहे. विरोधकांना एकत्र यावे लागेल. आपापसातले मतभेद दूर ठेवावे लागतील तर 2024 मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आशादायी पद्धतीचे निकाल आहेत. गुजरात मध्ये देखील लोकसभेत परिवर्तन होईल. जर सर्व एकत्र येऊन लढले तर हे शक्य आहे.
तुम्ही षंढ आहात: आम्ही महाराष्ट्रासाठी जेलमध्ये जायला तयार आहोत. षंड हा शब्द आपण शब्दकोशात पाहू शकतात. जे काही करू शकत नाही बिन कामाचा आहे त्याबाबतीत हा षंड शब्द वापरला जातो. गेल्या तीन महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे. राज्यपाल अपशब्द वापरतात या सरकारने त्यांचा निषेध तरी केला का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साध धिक्कार तरी केला का? कॅबिनेट ने निदा प्रस्ताव तरी केला का? याचाच अर्थ तुम्ही बिनकामाचे आहेत. तेव्हा तुम्ही म्हणतात जेलमध्ये टाकू. टाका ना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्ही तुम्हाला जाब विचारला म्हणून तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल, तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत.
हा महाराष्ट्र द्रोह: तुम्ही काही केले नाही. तुमची वाचा गेली हे सांगा. माझ्यावर बोलतात तुम्ही राज्यपालावर बोला. अपमान करणाऱ्यावरती बोला. मराठी सीमावाद अचानक उफाळून आलेला नाही, त्याला फोर्स आहे. भाजप पक्षाकडून शिवाजी महाराजांचा विषय लोकांनी विसरावा म्हणून हा सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमई रोज महाराष्ट्राच्या कानाखाली मारतात महाराष्ट्राच्या तोंडावर थूकत आहे तुम्ही काय करतात? तुम्ही काय ॲक्शन घेतली? हा महाराष्ट्र द्रोह आहे.
हा महाराष्ट्रावरचा हल्ला असेल: कन्नड वेदिका संस्थेने सांगितले आहे की, महाराष्ट्रात येऊन आम्ही संजय राऊत यांच्यावरती हल्ला करू. हा माझ्यावरती हल्ला नसेल हा महाराष्ट्र वरचा हल्ला असेल. आता तुम्ही काय थंड पणे पाहणार का? तिकडची संघटना शिवसेनेल महाराष्ट्रात येऊन धमक्या देतात. हल्ले करून सांगतात त्याच्यावरती बोला. राजकारण बाजूला ठेवा. आम्ही कोणासाठी भांडत आहोत? राज्यासाठी भांडत आहोत. तुम्हाला दोन शब्द बोललो तर तुमचे तीळ पापड होत आहे. तुम्ही सत्तेवर आहात त्यामुळे कृती करून दाखवा. तुम्ही माझी पत्रकार परिषद होऊन देणार नाही म्हणतात ही भाषा कन्नड वेदिका ची आहे.
बाळासाहेब देसाई मर्द होते: सत्तेत आहेत म्हणून आम्ही खरे मराठी असं त्यांना वाटत असेल किंवा मराठी रक्त त्यांच्या मनगटात असते तर त्यांनी मला शिवसेना म्हणून पाठीबा दिला असता. सत्तेत असल्यामुळे आम्ही तुमची मजबूरी समजू शकतो. मात्र, आम्ही लढत राहू. बाळासाहेब देसाई होते. शंभुराजे यांचे आजोबा मर्द मराठा माणूस होता. महाराष्ट्राच्या प्रश्नावर मराठी माणसाचे प्रश्नावर ते ठामपणे शिवसेनेच्या मागे उभे राहत होते. म्हणून आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे."