दिल्ली - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे. राहुल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी जाणून घेतले, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
![Sanjay Raut meets Congress leader Rahul Gandhi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12655051_raut-twit.png)
दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची संजय राऊत यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र होत असलेल्या राजकीय घडामोडी सविस्तर चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेची जडणघडण आणि कार्यपद्धती बाबत सविस्तरपणाने जाणून घेतले असे संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.