ETV Bharat / bharat

चूक करूनही स्वतःची पाठ थोपटण्याचा आत्मविश्वास येतो कुठून? संजय राऊतांचा मोदी सरकारला टोला

एखादी चूक केल्यानंतर त्याचाही इव्हेंट कसा करावा हे केंद्र सरकारकडून शिकण्यासारखे आहे अशी टीका करतानाच एवढा आत्मविश्वास येतो कुठून? असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी राज्यसभेत केंद्र सरकारला लगावला. यातला थोडा आत्मविश्वास आम्हालाही द्या, आम्हालाही या आत्मविश्वासाची गरज आहे असेही ते उपहासाने विरोधकांना उद्देशून म्हणाले.

author img

By

Published : Aug 11, 2021, 4:45 PM IST

चूक करूनही स्वतःची पाठ थोपटण्याचा आत्मविश्वास येतो कुठून? संजय राऊतांचा मोदी सरकारला टोला
चूक करूनही स्वतःची पाठ थोपटण्याचा आत्मविश्वास येतो कुठून? संजय राऊतांचा मोदी सरकारला टोला

नवी दिल्ली : एखादी चूक केल्यानंतर त्याचाही इव्हेंट कसा करावा हे केंद्र सरकारकडून शिकण्यासारखे आहे अशी टीका करतानाच एवढा आत्मविश्वास येतो कुठून? असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी राज्यसभेत केंद्र सरकारला लगावला. यातला थोडा आत्मविश्वास आम्हालाही द्या, आम्हालाही या आत्मविश्वासाची गरज आहे असेही ते उपहासाने विरोधकांना उद्देशून म्हणाले.

चूक करूनही स्वतःचीच पाठ थोपटली

राज्यसभेत शुक्रवारी 127 व्या घटनादुरूस्ती विधेयकावर चर्चा झाली. यावेळी बोलताना शिवसेना खासदार यांनी घटनादुरूस्तीचे स्वागत करतानाच केंद्र सरकारवरही ताशेरे ओढले. जेव्हा केंद्र सरकारने 2018 मध्ये मागासवर्ग ठरविण्यासंदर्भात राज्यांचे अधिकार कमी करून केंद्रीय मागास आयोगाला अधिकार दिले, तेव्हाच आम्ही असे करू नका असा इशारा दिला होता. सरकारने तेव्हा चूक केली, मात्र चूक करूनही सरकार स्वतःचीच पाठ थोपटून घेत होते. चूक केल्यानंतरही त्याचा इव्हेंट कसा करावा हे केंद्र सरकारकडून शिकण्यासारखे आहे. एवढा आत्मविश्वास नेमका येतो कुठून? एवढा आत्मविश्वास असेल तर त्यातला थोडा आम्हालाही द्या, इकडेही आत्मविश्वासाची गरज आहे असे राऊत म्हणाले.

50 टक्क्यांची मर्यादा हटविण्याची मागणी

यावेळी बोलताना ही घटनादुरूस्ती करण्यासोबतच आरक्षणावर असलेली 50 टक्क्यांची मर्यादा हटविण्यासाठीही केंद्राने पुढाकार घेण्याची गरज राऊत यांनी व्यक्त केली. अन्यथा या घटनादुरूस्तीचा काहीही उपयोग होणार नाही. हा केवळ मागासवर्ग ठरविण्याचा विषय नसून मराठ्यांसह आरक्षणाची मागणी करणाऱ्या देशातील अनेक समुदायांविषयीचा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने त्यादृष्टीनेही प्रयत्न करण्याची मागणी राऊत यांनी केली.

हेही वाचा - Monsoon Session Updates : 127वं संविधान संशोधन विधेयक आज राज्यसभेत मांडणार;अनिश्चित काळपर्यंत लोकसभा तहकूब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.