इंदूर - पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचं कौतुक करताना सामना अग्रलेखाचे संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींची तुलना अहिल्यादेवी होळकरांसोबत केली. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपाचे बंगाल प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी शुक्रवारी इंदूरमध्ये प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. अहिल्याबाई यांच्याविषयी राऊत यांनी वाचले नसले, असे ते म्हणाले.
इंदूरचे भाजपा खासदार लालवाणी यांनीही संजय राऊत यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कचरा हा संजय राऊतची सवय आहे, परंतु अहिल्यादेवी होळकरांचा आपमान आम्ही सहन करणार नाही. राऊत यांनी माफी मागावी, असे ते म्हणाले.
काय म्हटलं होते संजय राऊत यांनी?
दैनिक सामनामधील रोखठोक या स्तंभामधून संजय राऊत यांनी भाजपच्या पश्चिम बंगालमधील पराभवाची समीक्षा केली होती. यावेळी त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना अहिल्यादेवी होळकर यांच्याशी केली. ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला नाही. तर आभाळ कोसळेल, असे वातावरण देशात निर्माण केले गेले. पण शेवटी ममता बॅनर्जींकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. जे नव्हते तेच बाईंनी पणाला लावले. या लढ्याची तुलना अहिल्याबाई होळकरांच्या लढ्याशीच करावी लागेल, असे संजय राऊत म्हणाले होते.
हेही वाचा - 'वाचवणारा हा नेहमी मारणाऱ्यापेक्षा मोठा असतो'