सागर (मध्यप्रदेश ) : मध्य प्रदेशातील सागरच्या जैन पब्लिक स्कूलमध्ये 30 शाळकरी मुलांनी एकाच सिरिंजने कोरोनाची लस दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेची माहिती पालकांना मिळताच त्यांनी शाळेत पोहोचून एकच गोंधळ घातला. या गोंधळानंतर सीएमएचओ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी लसीकरण करणारे व लसीकरण अधिकारी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. जिल्हा लसीकरण अधिकाऱ्याला हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. लसीकरण करणारे प्रशिक्षणार्थी एएनएम यांच्याविरुद्धही एफआयआर नोंदवण्यात आला आहे. (Negligence in vaccination in Sagar) (Vaccine applied to 30 children with same syringe) (Corona Vaccination Sagar) (Corona vaccine camp for Children in Sagar)
अधिकाऱ्याचे तत्काळ प्रभावाने निलंबन : आयुक्त मुकेश शुक्ला यांनी लसीकरण मोहिमेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.शोभाराम रोशन यांना निलंबित केले. लसीकरणकर्त्याने 40 शाळकरी मुलांना एकाच सिरिंजने लस दिली होती. प्रथमदर्शनी जिल्हा लसीकरण अधिकारी यांनी लसीकरण केंद्रांची वेळोवेळी तपासणी केली नसल्याचे आढळून आले. लसीकरण मोहिमेत हलगर्जीपणा केल्याबद्दल त्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शाळेत लसीकरण शिबिराचे आयोजन : शहरातील मुख्य बसस्थानकावर असलेल्या जैन पब्लिक स्कूलमध्ये बुधवारी शाळकरी मुलांसाठी कोरोना लस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आरोग्य विभागाने एका खासगी नर्सिंग कॉलेजच्या नर्सिंग विद्यार्थिनीची ड्युटी लावली होती. लसीकरण करणाऱ्या जितेंद्र या नर्सिंगच्या विद्यार्थ्याने एका सिरिंजने सुमारे ३० मुलांना कोरोनाची लस दिली. हळुहळु हा प्रकार शाळेतील विद्यार्थ्यांना कळला आणि त्यांनी घरी जाऊन पालकांना घडलेला प्रकार सांगितला. लगेचच पालक शाळेत पोहोचले आणि त्यांनी जाऊन शाळेत एकच गोंधळ घातला.
प्रकरण उघडकीस आल्यानंतर लसीकरण करणारा बेपत्ता : गोपालगंज पोलीस ठाण्यात लसीकरण करणारा जितेंद्र अहिरवार यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. येथे प्रकरण तापल्यानंतर लसीकरण करणारा फरार झाला आहे. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याचा फोन बंद असल्याचे आढळून आले. या संदर्भात मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ.राकेश रोशन यांच्याकडून प्राप्त अभिप्रायाच्या आधारे जिल्हा लसीकरण अधिकारी यांची विभागीय चौकशी करून कारवाई करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
हेही वाचा : Vaccination for children : लहान मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी ‘हर घर दस्तक’ मोहीम