ETV Bharat / bharat

Kapurthala sacrilege case: सुवर्णमंदिरानंतर आता कपूरथलामध्येही 'बेअदबी'चा प्रकार

पंजाबच्या सुवर्ण मंदिरात शनिवारी झालेल्या बेअदबीच्या ( Golden Temple sacrilege case ) प्रकारानंतर आता पंजाबच्या कपूरथला ( Kapurthala sacrilege case ) जिल्ह्यातही तशीच घटना घडली आहे. एका व्यक्तीने निशान साहिबशी बेअदबीचा ( Nishan Sahib Sacrilege Case ) प्रयत्न केला आहे.

सुवर्णमंदिर
सुवर्णमंदिर
author img

By

Published : Dec 19, 2021, 4:00 PM IST

कपूरथला (पंजाब): पंजाबमधील सुवर्ण मंदिरात गुरु ग्रंथ साहिबची बेअदबी ( Golden Temple sacrilege case ) करण्याचा प्रकार झाल्यानंतर रविवारी पंजाबच्या कपूरथला ( Kapurthala sacrilege case ) जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना निजामपूर गावात घडली. जिथे एका व्यक्तीने पवित्र अशा निशान साहिबशी बेअदबी ( Nishan Sahib Sacrilege Case ) केली. याबाबत सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे.

सुवर्णमंदिर प्रकरणी गुन्हा दाखल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्थानिक लोक त्या व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. या व्यक्तीला नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, सुवर्णमंदिरात विटंबना केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पवित्र गुरू ग्रंथ साहिब ठेवलेल्या आरक्षित जागेत उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त भाविकांनी शनिवारी एका तरुणाला बेदम मारहाण केली. अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 295A, भादंवि 307 धार्मिक भावना दुखावणे व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन सायंकाळपर्यंत केले जाईल.

रेलिंग ओलांडून पोहोचला गुरु ग्रंथ साहिबजवळ

शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या व्यक्तीने सुवर्ण मंदिरात विटंबना करण्याचा प्रयत्न केला. तो घटनास्थळी असलेल्या शिरोमणी समितीच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ रोखला. हा तरुण रेलिंग ओलांडून गुरु ग्रंथ साहिबजवळ पोहोचला होता. सायंकाळचे पठण सुरू असताना ही घटना घडली. या कृत्यामुळे संतप्त झालेल्या भाविकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. घटनेच्या वेळी कर्तव्यावर असलेले सेवादार सधा सिंह यांनी नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिस्थिती शांततापूर्ण

"कालच्या घटनेनंतर, आम्ही येथे (सुवर्ण मंदिरात) सुरक्षा व्यवस्था केली आहे. शनिवार व रविवारला अनेक संत येतात. परिस्थिती शांततापूर्ण आहे," असे एसीपी संजीव कुमार यांनी रविवारी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले.

गुरुजींची तलवार उचलली

डीएसपी अमृतसर, परमिंदर सिंग भंडल यांनी घटनेनंतर मीडियाशी बोलताना सांगितले की, "संध्याकाळच्या पठणाच्या वेळी, एका २५ वर्षीय व्यक्तीने हरमंदिर साहिबमध्ये प्रवेश केला आणि गुरुजींची सिरी साहिब (तलवार) उचलली, परंतु त्या व्यक्तीला तातडीने पकडण्यात आले. पण, आरोपीला ताब्यात घेत असताना, त्याला संतप्त भाविकांनी मारहाण केली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.