ETV Bharat / bharat

#IndiaAt75 : 'सबका साथ-सबका विश्वास, यासोबतच आता 'सबका प्रयास'; मोदींचा नवा नारा - #IndiaAt75

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन सलग आठव्या वर्षी संबोधित केले. यावेळी मोदींनी आत्मनिर्भर भारत, उर्जा, जल संरक्षण, कोरोना, लसीकरण, अमृत महोत्सव, ऑलिंपिक आदी विषयावर भाष्य केले.

Modi
मोदी
author img

By

Published : Aug 15, 2021, 11:22 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. पंतप्रधान तिरंगा ध्वज फडकवत असताना हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवर्षाव करण्यात आला. यानंतर पंतप्रधानांनी देशवासियांना लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन सलग आठव्या वर्षी संबोधित केले. यावेळी मोदींनी आत्मनिर्भर भारत, उर्जा, जल संरक्षण, कोरोना, लसीकरण, अमृत महोत्सव, ऑलिंपिक आदी विषयावर भाष्य केले.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

  • भारताच्या प्रगतीसाठी, #AatmaNirbharBharat बनवण्यासाठी भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होणं आवश्यक आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होण्यापूर्वी भारताला उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवू, असा संकल्प आज भारताला करावा लागला.
  • देशात जल संरक्षण अभियान सुरु करण्यात आले आहे. आणि पाण्याची बचत करणे ही आपली सवय बनवणे हे आपले कर्तव्य आहे. राष्ट्र प्रथमची भावना असून आपली ताकद आपली ही एकजूट आहे, असे ते म्हणाले.
  • मी भविष्यवेत्ता नाही. कर्मातून मिळणाऱ्या फळावर माझा विश्वास आहे. देशातील युवकांवर, शेतकऱ्यांवर, व्यावसायिकांवर आणि मुलींवर माझा विश्वास आहे. ही पिढी कॅन डू जनरेशन (Can Do Generation) आहे. ती प्रत्येक लक्ष्य साध्य करू शकते, असे मोदी म्हणाले.
  • अमृत महोत्सव देशातील नागरिकांचा उत्सव आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मी अभिवादन करतो.
  • राष्ट्र विकसित करण्याचे आपले ध्येय आहे. किमान सरकार, कमाल प्रशासन' हा मंत्र घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे, असे मोदी म्हणाले.
  • आत्मनिर्भर भारत #AatmaNirbharBharat प्रत्येक उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी अतिशय महत्वाचे आहे. 'सबका साथ-सबका विकास,सबका विश्वास आणि सबका प्रयास', हेच महत्त्वाचे आहे.
  • टोकियोत देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी खेळाडूंनी केली. खेळाडूंनी फक्त मने जिंकली नाहीत. तर त्यांनी देशातील तरुण पिढीला प्रेरित केले. त्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो.

हेही वाचा - #IndiaAt75 : पंतप्रधान मोदींसह मान्यवरांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!, वाचा एका क्लिकवर

हेही वाचा - 75th Independence Day: मुलींच्या यशात विकसित भारताची झलक - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.