ETV Bharat / bharat

S Jaishankar : 'लोकशाहीबाबत इतर कोणाकडून शिकण्याची गरज नाही', परराष्ट्रमंत्री एस जयशंकर अमेरिकेत 'गरजले' - एस जयशंकर अमेरिका दौरा

S Jaishankar : परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

S Jaishankar
S Jaishankar
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 9:06 AM IST

वॉशिंग्टन डीसी S Jaishankar : देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी वॉशिंग्टनमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित केलं. Fथे एका प्रश्नाला उत्तर देताना, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताला कोणाकडून शिकण्याची गरज नाही', असं ते म्हणाले. भारत आणि कॅनडा यांच्यात सुरू असलेल्या तणावाबाबत त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ हिंसा भडकावणं असा होऊ शकत नाही, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

  • Pleased to meet Members of Congress, Administration, business and think tank heads at India House.

    Our regular conversations keep India-US relationship strong. pic.twitter.com/f9G79irwcd

    — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) September 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लोकशाहीबाबत इतर कोणाकडून शिकण्याची गरज नाही : पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, 'मी येथील सर्व अमेरिकन आणि कॅनडियन लोकांबद्दल बोललो आहे. आम्ही लोकशाही राष्ट्र आहोत. आम्हाला त्याबद्दल इतर कोणाकडून शिकण्याची गरज नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व आम्ही जाणतो. त्याच्या आडून हिंसाचार भडकावण्याचं स्वातंत्र्य दिलं जाऊ शकत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून हिंसा भडकावणं आणि त्याला परवानगी देणं म्हणजे स्वातंत्र्याचं रक्षण नाही, तर त्याचा गैरवापर आहे', असं ते म्हणाले.

  • Great to meet my friend US Secretary of State @SecBlinken at State Department today.

    A wide ranging discussion, following up on PM @narendramodi’s June visit. Also exchanged notes on global developments.

    Laid the groundwork of our 2+2 meeting very soon. pic.twitter.com/mOw9SIX1dO

    — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) September 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कॅनडावर नाव न घेता टीका केली : एस जयशंकर यांना हा प्रश्न कॅनडाच्या संदर्भात विचारण्यात आला होता. कॅनडा खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय आणि प्रोत्साहन देत असल्याचा आरोप भारत सातत्यानं करत आहे. कॅनडा मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हे सर्व आरोप फेटाळून लावतोय. कॅनडाचं नाव न घेता जयशंकर म्हणाले की, 'भारताच्या राजदूत आणि नागरिकांना धमक्यांचा सामना करावा लागतोय. यावर तुमची प्रतिक्रिया काय असू शकते? तुम्ही जर माझ्या जागी असता तर तुमची प्रतिक्रिया काय असती? तुमचे राजदूत, तुमचा दूतावास, तुमचे नागरिक असते तर तुमची प्रतिक्रिया काय असती?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक समानता : या वर्षी जुलैमध्ये सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला होता. या संदर्भातही जयशंकर यांना प्रश्न विचारण्यात आला. 'या मुद्यावर सातत्यानं चर्चा होण्याची गरज आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांना अनेक आयाम आहेत. दोघांमध्ये अनेक समानता आहेत. आम्ही अनेक मुद्द्यांवर एकत्र काम करत आहोत. या विषयावर आम्ही बोललोही आहोत. सतत चर्चा आणि संवादातून हे प्रश्न सोडवले जातील', असं ते म्हणाले.

सॅन फ्रान्सिस्कोमधील दूतावासावर हल्ला झाला होता : या वर्षी जुलैमध्ये खलिस्तान समर्थकांच्या एका गटानं अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाला आग लावण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवानं यात कोणतही मोठं नुकसान किंवा कोणीही जखमी झालं नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. India Canada Row : हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण; मी 'फाईव्ह आईज'चा भाग नाही, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुनावलं
  2. Justin Trudeau Reaction : 'भारताला चिथावण्याचा प्रयत्न नाही, आम्ही तर फक्त..', मोदी सरकारच्या पलटवारानंतर कॅनडाचे पंतप्रधान नरमले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.