नवी दिल्ली/ मॉस्को - रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. तुमच्या हातात सत्ता घ्या, असे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी ( Russia Ukraine crisis updates ) युक्रेनच्या सैन्यदलाला आवाहन केले आहे. पुतीन यांनी यापूर्वीच युक्रेनविरोधात कारवाई करण्याचे ( Russia Declares War On Ukraine ) करण्याचे आदेश रशियन सैन्याला दिले आहेत.
युक्रेनमधून आमच्या नागरिकांना त्वरित आणावे, अशी आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आमचा विश्वास आहे, की सरकार त्याप्रमाणे काहीतरी नियोजन करेल, आम्हाला त्याची केंद्र सरकार माहिती सांगेल, असे ठाकरे म्हणाले.
आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ संघटनेचा झटका; 44 वी ऑलिम्पियाड बुद्धीबळ स्पर्धेचे रशियात होणार नाही आयोजन
युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाविरोधात जगभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. 44 व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड ( the 44th Chess Olympiad ) आणि दिव्यांग, फिडे काँग्रेस (FIDE Congress ) या बुद्धीबळ स्पर्धांचे रशियात आयोजन करण्याचा निर्णय जागतिक बुद्धीबळ संघटनेने ( International Chess Federation Council ) घेतला आहे.
शस्त्र खाली टाकत युक्रेनने आत्मसमर्पण करावे, असे रशियाने म्हटले आहे. पुतीन यांच्या या निर्णयामुळे पाश्चात्य देशांमध्ये खळबळ उडाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमी पुतीन ( Russian President Vladimir Putin ) यांच्या निर्णयाचा अमेरिकेने निषेध ( USA protest Russian war against Ukraine ) नोंदवला आहे. रशियाच्या या निर्णयावर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी चांगलेच संतापलेले दिसत आहेत. अमेरिका आणि ब्रिटननेही रशिया आणि युक्रेन या दोन्ही प्रदेशांवर कडक निर्बंध लादण्यास सुरवात केली.
हेही वाचा-War Affected Areas In Ukraine : युक्रेन रशिया युद्धाची भीषणता : पाहा VIDEO
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 'लुगान्स्क पीपल्स रिपब्लिक (Lugansk Peoples Republic )' आणि 'डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक ( Donetsk Peoples Republic )' यांना स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून मान्यता देणाऱ्या दोन आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. डोनेस्तक आणि लुगान्स्क ही युक्रेनमधील दोन राज्ये आहेत. येथील रशियन समर्थक फुटीरतावाद्यांनी युक्रेन सरकारविरुद्ध युद्ध पुकारले आहे. गेल्या दिवसांपासून ते युक्रेनपासून वेगळा स्वतंत्र देश होण्याच्या प्रयत्नात होते. गेल्या आठ वर्षांपासून युक्रेनचे सैन्य या फुटीरतावाद्यांशी लढत आहे.
हेही वाचा-Russia Ukraine Crisis : UNSC मध्ये युक्रेनचा प्रश्न ऐरणीवर; रशियावरील ठरावावर आज मतदान
युक्रेनचे महत्त्व -
युक्रेन हा भारतासारखाच बहुभाषिक देश असून रशिया आणि युक्रेनियन लोकांचा वंश एकच म्हणजे स्लॉव्ह आहे. मात्र, या देशाचे दोन ठळक भाग आहेत. पश्चिमेकडील भागावर युरोपचा मोठा प्रभाव आहे. तर पूर्वेकडील भागावर रशियाचा प्रभाव आहे. युक्रेन हा युरोप आणि रशिया यांच्या दरम्यान असल्याने दोन्ही तो आपल्या प्रभावाखाली असावा, असे युरोपीय देश आणि रशिया या दोघांनाही वाटते. आर्थिक कारणांबरोबरच सामरिक कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. आता पुतीन यांनी युद्ध पुकारल्याने हे युरोपातील 1945 नंतरचं सगळ्यात मोठं युद्ध असेल. केवळ युक्रेनची नव्हे तर रशियाचीही या युद्धात मोठी जीवितहानी होऊ शकते.
रशियावर त्वरित आणि गंभीर खर्च लादतील
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवसाच्या लढाईनंतर 137 जणांचा मृत्यू झाला. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणतात की, अमेरिका आणि आमचे सहयोगी आणि भागीदार या अनावश्यक आक्रमक कृत्यासाठी रशियावर त्वरित आणि गंभीर खर्च लादतील. आम्ही आमच्या नाटोशीही समन्वय साधू.
चीनने इतिहासाच्या बाजूने उभे रहावे
युतीच्या विरोधात कोणतीही आक्रमकता रोखणारा मजबूत, एकत्रित प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी सहयोगी असल्याचे यूएस परराष्ट्र मंत्री, अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले. चीन किंवा कोणत्याही देशासाठी इतिहासाच्या कोणत्या बाजूने उभे राहायचे आहे याचा विचार करण्याचा हा खरोखरच क्षण आहे, असे व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री, अँटोनी ब्लिंकन यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या (चीन) समकक्षांशी चर्चा केली होती. राष्ट्राध्यक्ष बायडेन नक्कीच त्यांच्या समकक्षांशी बोलण्यासाठी खुले आहेत, परंतु मला या क्षणी याबद्दल कोणताही अंदाज नाही असेही व्हाईट हाऊस प्रेस सेसी जेन साकी म्हणाले.
पुतिन-मोदींमध्ये चर्चा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. युक्रेनच्या सभोवतालच्या परिस्थितीवर चर्चा करताना, पुतिन यांनी डॉनबासच्या नागरी लोकसंख्येविरुद्ध कीवच्या आक्रमक कृतींची माहिती दिली. डिसेंबर 2021 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या रशियन-भारतीय शिखर परिषदेच्या संदर्भात द्विपक्षीय सहकार्याच्या काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. रशियन दूतावास: विविध स्तरांवर संपर्क कायम ठेवण्याचे मान्य करण्यात आले असल्याचे रिशयन दुतावासाने सांगितले.
युक्रेनला तात्काळ आर्थिक मदत देण्यास तयार - जागतिक बँक
जागतिक बँकेने गुरुवारी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या राजकीय आणि लष्करी संकटाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला तात्काळ आर्थिक मदत देण्यास तयार आहे. "आम्ही युक्रेनला तात्काळ सहाय्य देण्यास तयार आहोत आणि अशा समर्थनासाठी जलद-वितरण वित्तपुरवठ्यासह पर्याय तयार करत आहोत. विकास भागीदारांसोबत, जागतिक बँक समूह जलद प्रतिसादासाठी आमची सर्व वित्तपुरवठा आणि तांत्रिक सहाय्य साधने वापरेल," असे निवेदनात म्हटले आहे.
व्हाईट हाऊसबाहेर निदर्शने
मागील एका तासापासून अमेरिकेतील व्हाईट हाऊसबाहेर काही कार्यकर्ते निदर्शने देत आहे. रशिया-युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धांचा निषेध नोंदवत असून शांततेनं प्रश्न निकाली काढण्याचे सूचवत आहे. शुक्रवारी पहाटे रशियन सैन्याने राजधानी कीववर हल्ला केला. दरम्यान युक्रेन सैन्याने शत्रूचे विमान पाडले आहे. त्यानंतर विमान एका निवासी इमारतीवर कोसळल्याने इमारतीला आग लागली. आज पहाटे कीवमध्ये दोन जोरदार स्फोट ऐकू आले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काल कीव येथे पूर्व युक्रेनमध्ये लष्करी कारवाईला परवानगी दिली.