ETV Bharat / bharat

...तर आपल्याला चीन पुढे झुकावे लागेल - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत - मोहन भागवत

'आपण समाज म्हणून चीनबद्दल कितीही ओरडलो आणि चीनी वस्तूंवर बहिष्कार घातला, पण तुमच्या मोबाईलमध्ये जे काही आहे ते कुठून येते. त्यामुळे चीनवर आपण अवलंबून राहिलो तर आपल्याला चीनपुढे झुकावे लागेल, असे डॉ. मोहन भागत म्हणाले.

डॉ. मोहन भागवत
डॉ. मोहन भागवत
author img

By

Published : Aug 15, 2021, 8:31 PM IST

Updated : Aug 15, 2021, 10:21 PM IST

मुंबई - जर चीनवर आपण निर्भर राहू तर आपल्याला त्यांच्यासमोर झुकावे लागेल, असे विधान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. भारताच्या 75 व्या स्वातंत्र दिनानिमित्त मुंबईतील एका शाळेत ध्वजारोहनानंतर ते बोलत होते. 'स्वदेशी'चा अर्थ भारताच्या अटींवर व्यवसाय करणे देखील आहे. ते म्हणाले, 'आपण इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा खूप वापर करतो. आपल्या देशात मूलभूत तंत्रज्ञान नाही. हे बाहेरून आले आहे. शिवाय 'आपण समाज म्हणून चीनबद्दल कितीही ओरडलो आणि चीनी वस्तूंवर बहिष्कार घातला, पण तुमच्या मोबाईलमध्ये जे काही आहे ते कुठून येते. त्यामुळे चीनवर आपण अवलंबून राहिलो तर आपल्याला चीनपुढे झुकावे लागेल, असे डॉ. मोहन भागत म्हणाले.

'आपण स्वावलंबी व्हायला हवे'

आर्थिक सुरक्षा महत्वाची आहे. तंत्रज्ञानाचे रुपांतर आपल्या अटींवर आधारित असावे. आपण स्वावलंबी बनले पाहिजे. संघप्रमुख म्हणाले, स्वदेशीचा अर्थ इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणे नाही. आंतरराष्ट्रीय व्यापार चालू राहील पण आपल्या अटींवर. त्यासाठी आपल्याला स्वतःवर अवलंबून राहावे लागेल, असेही भागवत म्हणाले. शिवाय आपण घरी जे उत्पादन करू शकतो ते बाहेरून खरेदी करू नये. आर्थिक दृष्टिकोन अधिक उत्पादन करण्यासाठी असावा आणि उत्तम दर्जाच्या उत्पादनासाठी स्पर्धा असावी, असे यावेळी भागवत यांनी सांगितले. भागवत म्हणाले, की आपण आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यापारांच्या विरोधात नाही पण आपले उत्पादन खेड्यांमध्ये असले पाहिजे. हे मोठ्या प्रमाणावर उत्पादन नसून लोकांनी उत्पादन केले पाहिजे. शिवाय विकेंद्रीकृत उत्पादनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल. अधिक उत्पादकांसह, लोक अधिक आत्मनिर्भर होतील आणि होणारे उत्पन्न समान प्रमाणात वितरित केले जावे.

'उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे'

यावेळी बोलतांना डॉ. मोहन भागवत म्हणाले की, उद्योगांना सरकारकडून प्रोत्साहन मिळाले पाहिजे. सरकारने नियमक म्हणून काम केले पाहिजे आणि स्वतःहून व्यवसाय करू नये. सरकार उद्योगांना आवाहन करावे, की जे देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे ते तयार करा आणि उद्योगांना प्रोत्साहन द्या. आपला संपूर्ण राष्ट्रीयीकरणावर विश्वास नाही, परंतु हे देखील खरे नाही की राष्ट्राचा उद्योगांशी काहीही संबंध नाही. या सर्वांनी एक कुटुंब म्हणून एकत्र काम केले पाहिजे, असे यावेळी भागवत म्हणाले.

'लोककेंद्रित उत्पादन असावे'

सरसंघचालक म्हणाले, की उत्पादन हे लोककेंद्री असावे. तसेच संशोधन आणि विकास, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) आणि सहकारी क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. नैसर्गिक संसाधनांचे शोषण होणार नाही याची खात्री करण्यासाठी 'नियंत्रित उपभोक्तावाद' आवश्यक आहे. शिवाय आपण किती कमावतो यावरुन राहणीमान ठरवले जाऊ नये, तर आपण लोकांच्या कल्याणासाठी किती करतो हे महत्त्वाचे आहे, असे यावेळी डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले. जेव्हा आपण सर्वांच्या कल्याणाचा विचार करू तेव्हा आपल्याला आनंद होईल. आनंदी होण्यासाठी आपल्याला चांगली आर्थिक स्थिती हवी आहे आणि यासाठी आपल्याला आर्थिक बळ हवे आहे, असे प्रतिपादनही यावेळी डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.

Last Updated : Aug 15, 2021, 10:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.