ETV Bharat / bharat

लग्नासाठी म्हणून धर्मांतर करणारे हिंदू चूक करत आहेत- मोहन भागवत - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

हल्दवानी येथील 'परिवार प्रबोधन' कार्यक्रमात आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे की, जे आपल्या मुलांचे धर्मांतर करतात ते चुकीचे आहेत. आम्ही आमच्या मुलांना तयार करत नाही. त्याचे संस्कार आपल्याला आपल्या घरीच द्यावे लागतात.

मोहन भागवत
मोहन भागवत
author img

By

Published : Oct 13, 2021, 7:15 AM IST

हल्दवानी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे राज्य संघटनेला मजबूत करण्यासाठी हल्द्वानीच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, रविवारी त्यांनी 'परिवार प्रबोधन' कार्यक्रमात संघ परिवाराशी संबंधित 2500 लोकांना संबोधित केले.

या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी कार्यक्रमात धर्मांतराविषयी मोठी गोष्ट सांगितली आहे. त्याने म्हटले आहे की धर्मांतर कसे होते? लहान लहान स्वार्थासाठी हिंदू मुली आणि मुले लग्नासाठी इतर धर्म कसे स्वीकारतात? जे हे करतात, ते चुकीचे करतात. आपण आपल्या मुलांची चांगली काळजी घेत नाही का? हे धडे आपण आपल्या मुलांना घरीच द्यायचे आहेत. आपण त्यांच्यामध्ये धर्माबद्दल आदर निर्माण केला पाहिजे.

मोहन भागवत

धर्माचा आदर करण्यासाठी संस्काराचे धडे द्यावे लागतील-

या दरम्यान, आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले धर्माचा आदर करण्यासाठी आता आपल्याला मुलांना त्याचे संस्कार घरीच द्यावे लागतील. मुलांना त्यांच्या धर्माबद्दल आणि उपासनेबद्दल आदर आणि अभिमान बाळगायला शिकवावे लागेल. ते पुढे म्हणाले की आपण आपल्या परंपरेनुसार आपली भाषा, पेहराव, इमारत, भोजन, दौरा आणि भजन केले पाहिजे. तरच भारत विश्वगुरू बनू शकतो. भारताच्या विकासासाठी आपल्याला आपल्या सामाजिक शैलीमध्ये बदल आणावा लागेल.

भागवत म्हणाले की, आपल्या देशातील मुले -मुली इतर धर्मांमध्ये विवाह करत आहेत, जे चिंताजनक आहे. तसेच कोणत्याही देशाला कमकुवत करण्यासाठी, इतर देशातील शक्ती त्या देशातील तरुणांना ड्रग्जच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न करतात, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

याचबरोबर मुलांच्या मोबाईल वापराकडे लक्ष देण्याची गरज आहे. पालकांनी त्यांचे मूल ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा मोबाईलवर काय पहात आहे याची काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्लाही भागवत यांनी यावेळी दिला आहे. 'OTT वर सर्व प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. माध्यमांमध्ये जे येते ते मुलांसाठी आणि आपल्या मूल्यांसाठी काय योग्य आहे, हे प्रतिबिंबित करत नाही. आपण आपल्या मुलांना घरी काय पाहावे आणि काय नाही हे शिकवायाला हवे असे ही यावेळी सरसंघचालक म्हणाले.

भागवत यांनी दिले सहा मंत्र -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख असेही म्हणाले की लोकांनी स्वतः धर्माशी संबंधित प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत, जेणेकरून मुलांनी येऊन काही विचारल्यास आपण गोंधळून जाऊ नये. भागवत म्हणाले की भारतीय संस्कृतीशी जोडलेले सहा मंत्र आहेत. यात भाषा, भोजन, भक्तीगीते, प्रवास, पेहराव आणि घर यांचा समावेश आहे. भागवत यांनी लोकांना पारंपारिक चालीरीती स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.

मोहन भागवत म्हणाले की, समाजातील गरीब वर्गाला आपल्यासोबत घेण्याची गरज आहे. आपण जातीच्या बंधनातून बाहेर पडून एक मजबूत भारत घडवला पाहिजे. मोहन भागवत यांनी सांगितले आहे की, घरी फक्त भारतीय पारंपरिक अन्न खा. कधी कधी पिझ्झा जातो. प्रत्येकाने परदेश प्रवास केला पाहिजे, परंतु तीर्थक्षेत्रांनाही भेट दिली पाहिजेत असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा - धक्कादायक : कब्बडी खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मानेवर कोयत्याने वारकरून केली निर्घृण हत्या

हेही वाचा - एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.