ETV Bharat / bharat

Rozgar Melava 2023 : पंतप्रधानांनी 51 हजार उमेदवारांना दिलं नियुक्ती पत्र

Rozgar Melava 2023 : दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधानांनी 51 हजार उमेदवारांना नियुक्ती पत्राचं वाटप केलं. गेल्या 9 वर्षांत नाविन्यपूर्ण पद्धतीनं बदल झालाय, तंत्रज्ञानामुळं भ्रष्टाचार कमी झाला असून सुविधा वाढल्याचं त्यांनी म्हटलंय.

Rozgar Mela 2023
Rozgar Mela 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 4:01 PM IST

नवी दिल्ली Rozgar Melava 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रोजगार मेळाव्याअंतर्गत 51 हजार उमेदवारांना नियुक्ती पत्राचं वाटप केलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'रोजगार मेलावाई'ला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजच्या काळात नवीन विचारांवर काम करणं गरजेचं आहे. आज तंत्रज्ञानाच्या मदतीनं अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. 9 वर्षांत आमच्या धोरणांमध्ये सकारात्मक बदल झाले आहेत. आज देश बदलाचा अनुभव घेत आहे. आज रोजगार मेळाव्या अंतर्गत नियुक्ती पत्र मिळालेल्या सर्व नवनियुक्त उमेदवारांचं मी अभिनंदन करतो. दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित या कार्यक्रमात त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 51 ठिकाणी उपस्थित तरुणांना जॉईनिंग लेटर दिलं.

  • #WATCH | Prime Minister Narendra Modi distributes about 51,000 appointment letters to newly inducted recruits in Government departments and organisations, under Rozgar Mela through video conferencing. pic.twitter.com/ONQRiVsI5O

    — ANI (@ANI) September 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

51 हजार तरुणांना नियुक्ती पत्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवव्या रोजगार मेळाव्याअंतर्गत 51 हजार तरुणांना नियुक्ती पत्र दिलं. या तरुणांची गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या विविध विभागात भरती करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांत नाविन्यपूर्ण पद्धतीनं मोठे बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यानं भ्रष्टाचार कमी होऊन सुविधा वाढल्या आहेत. देशभरात 46 ठिकाणी या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा : सरकारनं 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याचा संकल्प केला आहे. येत्या काही वर्षांत आपण जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनणार आहोत. या काळात प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याची भूमिका मोठी असणार आहे. तुम्हाला नेहमीच नागरिक-प्रथम भावनेनं काम करावं लागेल. तुम्ही तंत्रज्ञानात वाढलेल्या पिढीचा भाग आहात. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना केलं.

नव्या संसदेत देशाचं नवं भविष्य : आज अनेक महिलांना नियुक्तीपत्रेही मिळाली आहेत. भारताच्या मुली अंतराळापासून खेळापर्यंत अनेक विक्रम करत आहेत. काही दिवसांपूर्वीच नारी शक्ती वंदन कायद्याच्या माध्यमातून देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येला मोठं बळ मिळालं आहे. 30 वर्षांपासून प्रलंबित असलेलं हे विधेयक नवीन संसदेच्या पहिल्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांनी मंजूर केलं. एक प्रकारे देशाचं नवं भवितव्य नव्या संसदेत सुरू झालं आहे.

तांत्रिक बदलांमुळं सरकारी काम सोपं : तांत्रिक बदलांमुळं सरकारी काम सोपं झालं आहे. पूर्वी लोक रेल्वे स्टेशनच्या बुकिंग काउंटरवर रांगेत उभे असायचे. तंत्रज्ञानाने ही समस्या सोडवली आहे. आधार कार्ड, डिजिटल लॉकर्स, ई-केवायसीमुळं कागदपत्रं साठवणं सोपं झालं आहे.

तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळं भ्रष्टाचार कमी : तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळं भ्रष्टाचार कमी झाला आहे. आज देशाचा जीडीपी कठीण काळातही वेगानं वाढत आहे. आमच्या उत्पादनात, निर्यातीत जोरदार वाढ झाली आहे. आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये देश गुंतवणूक करत आहे.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.