ETV Bharat / bharat

PM Narendra Modi On Rozgar Mela : सरकारचे प्रत्येक धोरण रोजगार निर्मितीचे दार उघडणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी - राज्य सरकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशातील तब्बल 71 हजार उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येत आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देशभरातील 45 ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

PM Narendra Modi On Rozgar Mela
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : May 16, 2023, 10:41 AM IST

Updated : May 16, 2023, 12:07 PM IST

नवी दिल्ली : सरकारचे प्रत्येक धोरण हे रोजगार निर्मितीचे दार उघडणारे असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आज रोजगार मेळाव्यात 71 हजार नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित उमेदवारांना संबोधित केले. केंद्र सरकारच्या विविध विभागांसह राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नियुक्त केलेल्या उमेदवारांना ही नियुक्ती पत्रे दिली जात आहेत.

देशातील 45 ठिकाणी रोजगार मेळावा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत सकाळी 10.30 वाजता तब्बल 71 हजार नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येत आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून हा रोजगार मेळावा देशभरातील 45 ठिकाणी आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नियुक्ती पत्रे देण्यात येणारे उमेदवार हे देशभरातून निवडलेले असून भारत सरकारच्या अंतर्गत विविध पदांवर ते काम करणार आहेत.

विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश : या नवीन भरतीत ग्रामीण डाक सेवक, पोस्टल इन्स्पेक्टर, कमर्शियल-कम-तिकीट लिपिक, कनिष्ठ लिपिक, सह-टंकलेखक, कनिष्ठ लेखा लिपिक, ट्रॅक मेंटेनर, केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये तसेच राज्य सरकार आणि राज्य सरकारमधील सहाय्यक विभागासाठी या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. केंद्रशासित प्रदेशातील अधिकारी, निम्न विभाग लिपिक, उपविभागीय अधिकारी, कर सहाय्यक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, निरीक्षक, नर्सिंग अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, फायरमन, सहायक लेखाधिकारी, विभागीय लेखापाल, लेखा परीक्षक, हवालदार, हेड कॉन्स्टेबल, सहायक कमांडंट, प्रधान, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, सहाय्यक कुलसचिव, सहाय्यक प्राध्यापक आदी पदांवर या नियुक्त्या देण्यात आल्या असून त्यांना प्रातिनिधीक स्वरुपात ही नियुक्तीपत्रे वाटप करण्यात येत आहे.

रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य : रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने हे एक पाऊल असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करणार असल्याचेही पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना 'कर्मयोगी प्ररंभ' द्वारे स्वतःला प्रशिक्षण देण्याची संधी मिळेल. हा विविध सरकारी विभागांमध्ये सर्व नवीन भरतीसाठी ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम असल्याचेही पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले आहे.

हेही वाचा -

  1. Mamata Banerjee On Congress : काँग्रेसला कर्नाटकात मदत करू, त्यांनी बंगालमध्ये आमच्याबरोबर लढू नये - ममता बॅनर्जी
  2. Race for Karnataka CM 2023 : पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार, दिल्लीला जाणार नाही: डी के शिवकुमार यांची स्पष्टोक्ती
  3. Race for Karnataka CM 2023 : कर्नाटकात मुख्यमंत्री पदाचा पेच कायम; डीके शिवकुमार म्हणाले, माझी ताकद 135 आमदार!

Last Updated : May 16, 2023, 12:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.