ETV Bharat / bharat

Roger Federer Emotional Farewell : स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर शेवटच्या सामन्यानंतर झाला भावूक

रॉजर फेडररला लंडनमध्ये खेळला गेलेल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना जिंकता आला ( Roger Federer last match ) नाही. त्याची भेट अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉकशी झाली, ज्यात त्यांचा 4-6, 7-6(2), 11-9 असा पराभव झाला. सामना संपल्यानंतर फेडररने भावनिक होऊन निरोप ( Roger Federer emotional farewell ) घेतला.

Roger Federer
रॉजर फेडरर
author img

By

Published : Sep 24, 2022, 3:41 PM IST

लंडन: स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने ( Swiss star tennis player Roger Federer ) नुकतीच निवृत्ती जाहीर केली होती. 41 वर्षीय फेडररने शुक्रवारी (23 सप्टेंबर) अखेरचा सामना ( Roger Federer career last match ) खेळला. फेडररने हा सामना दुहेरीत खेळला. यामध्ये त्याचा जोडीदार स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल होता. लंडनमध्ये खेळलेल्या रॉजर फेडररला कारकिर्दीतील शेवटचा सामना जिंकता आला नाही. त्याचा सामना अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉकशी झाला, ज्यात त्यांचा 4-6, 7-6(2), 11-9 असा पराभव झाला. सामना संपल्यानंतर फेडररने भावनिक निरोप ( Roger Federer emotional farewell ) घेतला.

रॉजर फेडररला निरोप देताना इतर खेळाडू
रॉजर फेडररला निरोप देताना इतर खेळाडू

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये फेडररच्या शेवटच्या सामन्यानंतर त्याच्या डोळ्यांत अश्रू आल्याचे ( Roger Federer tears ) स्पष्ट दिसत आहे. तो रडताना दिसला. यादरम्यान नदालशिवाय सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचही ( Serbias star player Novak Djokovic ) त्याच्यासोबत दिसला. यासोबतच अनेक स्टार खेळाडूही उपस्थित होते. फेडररने या सर्वांना मिठी मारली आणि टेनिसला अलविदा केला.

यावेळी तो म्हणाला ( Roger Federer Retirement speech ) की हा दिवस खूप छान होता. मी दु:खी नाही आनंदी आहे. इथे येऊन खूप छान वाटतं, आणि शेवटच्या वेळी सगळं करताना मला आनंद झाला. खूप मजेदार, सर्व सामने, चाहते, कुटुंब, मित्र, असल्यामुळे मला फारसा ताण जाणवला नाही. आजही मी सामना खेळू शकलो याचा आनंद आहे. जर मी खेळू शकलो नसतो, तर मी आनंदी होऊ शकलो नसतो.

स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर
स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर

2018 मध्ये शेवटचे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले: रॉजर फेडररने 28 जानेवारी 2018 रोजी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शेवटचे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले. विजेतेपदाच्या लढतीत त्याने क्रोएशियाच्या मारिन सिलिकचा पराभव केला. त्यावेळी 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला. मात्र, या वर्षाच्या शेवटी राफेल नदालने त्याचा विक्रम मोडला. त्या विजेतेपदानंतर फेडररवर वयाचा प्रभाव स्पष्टपणे दिसू लागला आणि त्याचा फॉर्म घसरला. दुखापतीमुळे फेडररला यावर्षी एकाही ग्रँडस्लॅममध्ये भाग घेता आला नाही. फेडररने शेवटच्या वेळी 2021 फ्रेंच ओपनमध्ये ( 2021 French Open ) भाग घेतला होता.

रॉजर फेडरर आणि त्याचे सहकारी
रॉजर फेडरर आणि त्याचे सहकारी

या महिन्यात केली होती निवृत्तीची घोषणा: फेडररने या महिन्यात 15 सप्टेंबर रोजी सोशल मीडिया पोस्ट शेअर करून टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली ( Roger Federer Retirement ) होती. ते म्हणाले होते की, वयाच्या 41 व्या वर्षी मला वाटते की ते सोडण्याची वेळ आली आहे. फेडरने लिहिले की मी 41 वर्षांचा आहे. मी 24 वर्षात 1500 हून अधिक सामने खेळले आहेत. टेनिसने मला पूर्वीपेक्षा जास्त उदारतेने वागवले आहे आणि आता ही माझी स्पर्धात्मक कारकीर्द कधी संपेल हे मला ओळखावे लागेल.

रॉजर फेडरर आणि नदाल जोकोविच
रॉजर फेडरर आणि नदाल जोकोविच

सर्वाधिक पुरुष एकेरी ग्रँडस्लॅम विजेतेपद ( Most mens singles Grand Slam titles ) :

1. राफेल नदाल (स्पेन) - 22 (ऑस्ट्रेलियन-2, फ्रेंच-14, विम्बल्डन-2, US-4)

2. नोव्हाक जोकोविच (सर्बिया) - 21 (ऑस्ट्रेलियन-9, फ्रेंच-2, विम्बल्डन-7, US-3)

3. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड) - 20 (ऑस्ट्रेलियन-6, फ्रेंच-1, विम्बल्डन-8, यूएस-5)

4. पीट सॅम्प्रास (यूएसए)-14 (ऑस्ट्रेलियन-2, फ्रेंच-0, विम्बल्डन-7, यूएस-5)

रॉजर फेडरर आणि इतर खेळाडू भावूक
रॉजर फेडरर आणि इतर खेळाडू भावूक

हेही वाचा - Australian Open : नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनमधून सकारात्मक संदेशाची अपेक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.