रांची : लग्नाच्या वऱ्हाडाच्या पीकअपला झालेल्या अपघातात 4 वऱ्हाडींचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 11 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. हा अपघात गुमला जिल्ह्यातील डुमरी ब्लॉकमध्ये झाला. या पीकअप व्हॅनमध्ये तब्बल 40 ते 45 वऱ्हाडी बसलेले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मृतांमध्ये नवरीची आई लुंदरीदेवी ( वय 45 वर्ष ) वडील सुंदर गयार ( वय 50 वर्ष ) पुलीकार कुंडो ( वय 50 वर्ष ) सविता देवी आणि आलसू नगेशिया आदींचा समावेश आहे.
मुलीच्या लग्नावरुन परत येत होते वऱ्हाडी : डुमरी परिसरातील सारंगडीह येथून आपल्या मुलीच्या लग्नावरुन हे वऱ्हाडी कटारी या गावी परत येत होते. यावेळी जर्दा गावाजवळील या पीकअपचा भीषण अपघात झाला. या अपघातातील पीकअप प्रचंड वेगात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वेगात असल्यामुळे पीकअप वाहन अनियंत्रित झाले. या अनियंत्रित पीकअपने तीन वेळा पलट्या मारल्या. त्यामुळे पीकअपमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 11 जणांची प्रकृती गंभीर असून जखमींना सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर रुग्णालयात जखमींवर उपचार : जर्दा गावाजवळ घडलेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात मंगळवारी रात्री घडला असून जखमींना चैनपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तेथून सर्वांना सदर रुग्णालयात रेफर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. झरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सर्व जखमींना रिकाम्या बसमधून उचलून चैनपूर उपआरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवले. घटनेची माहिती मिळताच सदर रुग्णालय गुमलाचे उपअधीक्षक हे दोन ते तीन तास सदर रुग्णालयाच्या मुख्य गेटवर बसून जखमींची पोहोचण्याची वाट पाहत राहिले.
तीन जखमींना रिम्समध्ये पाठवले : या अपघातातील रुग्णवाहिका एकामागून एक सदर हॉस्पिटलमध्ये पोहोचू लागल्या. तेव्हा जखमींना आपत्कालीन वॉर्डमध्ये नेण्यात आले. यामध्ये तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तिघांनाही रिम्सकडे पाठवण्यात आले आहे. बाकीच्यांना हात, पाय आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सर्व वऱ्हाडी पीकअप व्हॅनने सारंगडीह गावात आपल्या मुलीचे लग्न आटोपून डुमरी ब्लॉक पंचायतीच्या कटारी गावात आपल्या घरी येत होते. मृतांमध्ये वधूची आई लुंदरीदेवी ( वय 45 वर्षे ) व वडील सुंदर गायर ( वय 50 वर्षे ), पुलीकर कुंडो ( वय 50 वर्षे ) , सविता देवी, वधूपक्षातील अलसू नागेशिया आदींचा मृत्यू झाला. तर जखमींमध्ये नवरीची मैत्रीण कुमारी ( वय 12 वर्षे ),उर्मिला कुमारी ( वय 11 ) , असोवन कुजूर ( वय 13 वर्ष ) आदींसह अनेक लोक जखमी आहेत.
हेही वाचा - Go First Crisis : गो फर्स्ट एअरलाईनची विमान सेवा दोन दिवस राहणार बंद, मुंबईला येणारी दोन विमाने सुरतला वळविली!