फतेहपूर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात मंगळवारी भीषण अपघात झाला. जेहानाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिल्ली वळणावर भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या 9 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 5 पुरुष, 2 महिला आणि 2 निष्पाप मुलांचा समावेश आहे. सर्वजण जेहानाबादच्या बारादरी येथे मुलगी पाहण्याच्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते.
9 जणांचा जागीच मृत्यू : जहानाबादमधील चिल्ली वळणाजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच संबंधित जेहानाबाद ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताच्या वेळी ऑटोमध्ये 11 जण बसलेले होते. अपघातानंतर घटनास्थळी येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी जमली. एकाचवेळी 9 मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला होता.
एका जखमीची प्रकृती गंभीर : सर्व मृत हे घाटमपूर येथील मूसानगरचे रहिवासी आहेत. त्यांच्या टेम्पोला चिल्ली वळणाजवळ समोरून येणाऱ्या टँकरने जोरात धडक दिली. धडक होताच ऑटोचे पार्ट्स उडून गेले आणि मृतदेह रस्त्यावर पत्त्यांसारखे विखुरले. मृतांमध्ये अनिल आणि त्याची पत्नी, मुलगी, मुलगा आणि नातेवाईकांचा समावेश आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय शंकर मिश्रा यांनी सांगितले की, मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या सोबतच जखमींना रुग्णवाहिकेद्वारे कानपूरला रेफर करण्यात आले असून, एका जखमीची प्रकृती गंभीर आहे.
हे ही वाचा :