ETV Bharat / bharat

Rishabh Pant Health Update ऋषभ पंतला लवकरच रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता, मैदानात होणार वापसी ? - ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी

दिल्ली देहराडून महामार्गावर भारतीय संघाचा फलंदाज ऋषभ पंतच्या कारचा अपघात झाला होता. अपघातानंतर ऋषभ पंतला मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या ऋषभ पंतची प्रकृती उपचारास चांगला प्रतिसाद देत आहे. त्यामुळे ऋषभ पंत लवकरच भारतीय संघात परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Rishabh Pant Health Update
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 18, 2023, 10:36 PM IST

मुंबई - भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर ऋषभ पंतला मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. आता ऋषभ पंतची प्रकृती उपचाराला चांगलाच प्रतिसाद देत आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ऋषभ पंत लवकरच तंदुरुस्त होऊन आपल्याला पुन्हा मैदानात दिसणार आहे.

दिल्ली देहराडून महामार्गावर झाला होता अपघात : भारतीय संघाचा फलंदाज ऋषभ पंतच्या आलिशान गाडीचा दिल्ली देहराडून महामार्गावर डिसेंबर 2022 मध्ये भीषण अपघात झाला होता. त्याची गाडी डिव्हायडरला धडकून रोडच्या बाजुला पडली होती. अपघातानंतर गाडीने पेट घेतल्यानंतर ऋषभ पंत गाडीतच होता. यावेळी गाडी फोडून ऋषभ पंत घटनास्थळावरुन बाहेर पडला होता. या अपघातात ऋषभ पंतचे तीन लिगामेंट्सला मार लागला होता. त्यातील दोन लिगामेंट्स बरे झाले आहेत. तर एका लिगामेंट्सवर उपचार सुरू आहेत. मात्र या लिगामेंट्सवर ऑपरेशनची गरज नसल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे ऋषभ पंतला लवकर सुटी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऋषभ पंत लवकरच करणार मैदानात वापसी : कार अपघातात ऋषभ पंतच्या लिगामेंट्सला गंभीर मार लागला होता. त्यात त्याचे लिगामेंट्स फाटले होते. त्यामुळे त्याच्यावर एससीएलची सर्जरी करणे खूप महत्वाचे होते. डॉक्टर ऋषभ पंतच्या पीसीएल स्थितीवर नजरठेवून आहेत. जर सर्जरीची गरज पडली नाही, तर ऋषभ पंत स्ट्रेंथनिंग प्रोग्राम सुरू करू शकतो. त्यामुळे त्याला चार ते सहा महिन्यातच मैदानात वापसी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऋषभ पंत लवकर तंदुरुस्त झाल्यास भारतीय क्रिकेट संघाच्या वतीने त्याच्या पुनर्वसनाची योजना आखली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एअर अॅम्बुलन्सने आणले मुंबईत : भारतीय संघाचा फलंदाज ऋषभ पंतच्या कारला रुरकीजवळ अपघात झाल्यानंतर त्याला मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला मुंबईतील कोकीलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात एअर अॅम्बुलन्सने आणण्यात आले आहे. त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयातच उपचार करण्यात येत आहेत. त्याला लवकरच रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा - Rishabh Pant Post After Accident : कार अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली सोशल मीडिया पोस्ट, म्हणाला..

हे ही वाचा - IND Vs NZ ODI : भारताचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, हार्दिक पुन्हा संघात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.