ETV Bharat / bharat

Uttarakhand assembly elections 2022 : उत्तराखंडमध्ये 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला - उत्तराखंड निवडणूक आयोग

देशातील इतर राज्यांप्रमाणेच उत्तराखंड राज्यातही यंदाच्या निवडणुकीत घराणेशाही ( Uttarakhand assembly elections 2022 ) दिसून येत आहे. राजकीय कौटुंबीक वारसा असतानाही पक्षातील कार्यानुसार संधी देणाऱ्या भाजपमध्येही घराणेशाही दिसून येत आहे. याच घराणेशाहीसाठी आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काहींनी पक्षांच्या वरिष्ठांची मनधरणी केली तर काहींनी पक्षच बदलले. काहींनी आपल्या अस्तित्वासाठी लाडक्या कार्यकर्त्यांना तिकिट मिळवून देण्यासाठी जोर लावला. यामध्ये हरक सिंह रावत व यशपाल आर्य यांसरख्या बड्या नेत्यांचाही समावेश आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Mar 9, 2022, 5:18 PM IST

हैदराबाद - देशातील इतर राज्यांप्रमाणेच उत्तराखंड राज्यातही यंदाच्या निवडणुकीत घराणेशाही दिसून येत आहे. राजकीय कौटुंबीक वारसा असतानाही पक्षातील कार्यानुसार संधी देणाऱ्या भाजपमध्येही घराणेशाही दिसून येत आहे. याच घराणेशाहीसाठी आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काहींनी पक्षांच्या वरिष्ठांची मनधरणी केली तर काहींनी पक्षच बदलले. काहींनी आपल्या अस्तित्वासाठी लाडक्या कार्यकर्त्यांना तिकिट मिळवून देण्यासाठी जोर ( Uttarakhand assembly elections 2022 ) लावला. यामध्ये हरक सिंह रावत व यशपाल आर्य यांसरख्या बड्या नेत्यांचाही समावेश आहे. भाजपचे वरिष्ठ नेता भुवन चंद्र खंडूड़ी, विजय बहुगुणा, हरभजन सिंह चीमा यांसह काँग्रेसचे वरिष्ठ नेता हरीश रावत व दिवंगत इंदिरा हृदयेश यांचाही समावेश आहे.

हरक सिंह रावत - राज्यातील राजकारणात दबाव तंत्राचा वापर करणारे बिनधास्त नेते हरक सिंह रावत यांनी यंदा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकत काँग्रेसशी हात मिळवले. मात्र, यंदा हरक सिंह रावत स्वतः निवडणूक न लढवता सून अनुकृती गुसाईं यांना लॅन्सडाउन विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

यशपाल आर्य - सतत चारवेळा आमदारकी मिळवणारे यशपाल आर्य यांनी मागची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली होती. मात्र, यंदा ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. यशपाल आर्य हे मुलगा संजीव आर्य यांनाही तिकीट मिळावे यासाठी भाजपकडे मागणी केली. संजीव आर्य हे 2017 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. मात्र, त्यांना डावलले गेल्याने यशपाल पक्षावर नाराज झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. काँग्रेसनेही यशपाल आर्य यांचा मान राखत पिता पुत्राला तिकीट दिले. यशपाल आर्य हे बाजपूर विधानसभा मतदार संघातून तर संजीव आर्य नैनीताल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

भुवन चंद्र खुंडूडी अन् हरभजन सिंह चीमा - भाजपचे वरिष्ठ नेता व माजी मुख्यमंत्री भुवन चंद्र खंडूडी यांची मुलगी ऋतु खंडूडी भाजपच्या तिकिटावर कोटद्वार विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. भाजपचे वरिष्ठ नेता विजय बहुगुणा यांचा मुलगा सौरभ बहुगुणा याला भाजपने दुसऱ्यांना सितारगंज मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. काशीपूर विधानसभा मतदारसंघात हरभजन सिंह चीमा यांनी आपला मुलगा त्रिलोक सिंह चीमाकडे राजकीय जबाबदारी सोपली असून त्रिलोक सिंह चीमा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

हरीश रावत अन् हृदयेश - काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांनी माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांची मुलगी अनुपमा रावत यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना हरिद्वार ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवल आहे. काँग्रेस महिला नेत्या दिवंगत इंदिरा हृदयेश यांचा मुलगा सुमित हृदयेश यांना हल्द्वानी मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे. आपल्या घराण्याचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी या सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भाजप व काँग्रेसचे नेते आपल्या जवळचे कार्यकर्ते व आपल्या कुटुंबाती व्यक्तींनी निवडणुकीच्या मैदानात उतरवत आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी या सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.