ETV Bharat / bharat

ambani visits guruvayur temple donates rs 1.51 cr अंबानींनी गुरुवायूर मंदिराला दिली 1.51 कोटी रुपयांची देणगी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी त्यांच्या लहान मुलाच्या भावी पत्नीसह ( धाकटी सून) केरळमधील प्रसिद्ध गुरुवायूर मंदिरात दर्शन आणि पूजा करण्यासाठी पोहोचले ( Mukesh Ambani visits Guruvayur temple ). यावेळी त्यांनी मंदिराला १.५१ कोटी रुपयांची देणगीही दिली आहे. याला मंदिर प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

ambani visits guruvayur temple donates rs 1.51 cr

author img

By

Published : Sep 19, 2022, 1:59 PM IST

त्रिशूर (केरळ) : भारतातील प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी केरळमधील प्रसिद्ध गुरुवायूर मंदिरात प्रार्थना केली आणि त्यांच्या 'अन्नदानम' निधीसाठी 1.51 कोटी रुपयांची देणगी दिली. मंदिर प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, मुकेश अंबानी मंदिरात दर्शनासाठी आले आणि त्यांनी देणगीही दिली ( Mukesh Ambani visits Guruvayur temple ). रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ( RIL ) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ( CMD ) मुकेश अंबानी यांच्यासोबत यावेळी धाकटा मुलगा अनंत अंबानी यांची भावी पत्नी ( धाकटी सून ) होती.

मंदिराच्या अधिकार्‍यांनी सांगितले की मंदिर प्रशासनाने अंबानीसमोर एक नवीन वैद्यकीय केंद्र बांधण्याची योजना देखील ठेवली होती. ज्यासाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च येईल आणि यासाठी त्यांची मदत मागितली. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मुकेश अंबानींनी या योजनेवर सकारात्मक विचार करू असे सांगितले. गेल्या महिन्यात रिलायन्स ग्रुपचे (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड) प्रमुख मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती की, त्यांची मुलगी ईशा हिला रिटेल व्यवसायाची धुरा आणि धाकटा मुलगा अनंतकडे ऊर्जा व्यवसायाची धुरा देण्यात आली आहे.

अंबानी यांनी याआधीच त्यांचा मोठा मुलगा आकाश याला रिलायन्स जिओ या समूहाच्या दूरसंचार शाखेचे प्रमुख केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) अंबानी यांनी ईशा आणि अनंत यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की ईशा रिलायन्स रिटेलची लीडर म्हणून काम करेल तर अनंत नवीन ऊर्जा व्यवसाय हाताळतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.