ETV Bharat / bharat

Top News Today : आजच्या महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर - सरत्या वर्षाला निरोप

देशभरात नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची जोरदार तयारी सुरू आहे.( New Year Celebration ) नववर्षाच्या निमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी बाजारपेठा सजल्या आहेत. सोबतच मुंबईतील पर्यटन स्थळेही नटली आहेत. मुंबईत वर्षाच्या शेवटी मोठ्या प्रमाणात पर्यटन दाखल झाले आहेत . त्यानिमित्ताने बेस्टकडून गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि इतर महत्त्वाच्या पर्यटन स्थळी अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार आहेत. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापुरुषांच्या सन्मानार्थ यात्रेचा समारोप होणार आहे. यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. ( Top News Today In Marathi )

Top News Today
महत्त्वाच्या बातम्या
author img

By

Published : Dec 31, 2022, 7:08 AM IST

मुंबई : देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर - ( Devendra Fadnavis on Beed tour ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दिवंगत विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती अभियानाच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये येणार आहेत. सकाळी व्यसनमुक्ती रॅलीचा समारोप देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होईल. ( Top News Today In Marathi )

  • महाबीजची वार्षिक आमसभा : आज 'महाबीज'ची वार्षिक आमसभा आहे. ( Annual General Meeting of Mahabeez ) यात संचालक, लाभधारक शेतकरी उपस्थित राहतील. गेल्या वर्षभरात खरीपात महाबीज बियाण्यांचे वाढलेले भाव यावरून लाभधारक शेतकरी आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. महाबीजचे अध्यक्ष आणि राज्याच्या कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले या आमसभेला उपस्थित असणार आहेत.
  • महापुरुषांच्या सन्मानार्थ यात्रेचा समारोप : राष्ट्रवादी काँग्रेस कडून महापुरुषांच्या सन्मानार्थ निघालेल्या यात्रेचा आज जिल्ह्यातील देऊळगाव येथे समारोप आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आ.अमोल मिटकरी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे.
  • नव्या वर्षाचे स्वागत : आज 2022 चा अखेरचा दिवस आहे.( Last day of 2022 ) देशभरात नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची जोरदार तयारी सुरू ( Welcome to the new year ) आहे. थर्टीफर्स्टच्या निमित्ताने पर्यटकांची पहिली पसंती गोव्याला असते. गोव्यात दरवर्षी थर्टीफर्स्टचा माहौल असतो. यंदा देखील पर्यट गोव्यात पोहोचले आहेत. याबरोबरच मुंबईत न्यू इअर सिलिब्रेशनसाठी ( New Year Celebration ) सर्वच हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, नाइट क्लबमध्ये कुठलेही निर्बंध नसल्याने मोठी गर्दी अगदी पहाटे पर्यंत पाहायला मिळणार आहे. यासाठी हॉटेल मालकांनी सुद्धा विशेष तयारी केली आहे.
  • मुंबईत स्थळी अतिरिक्त गाड्या : नववर्षाच्या निमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी बाजारपेठा सजल्या आहेत. सोबतच मुंबईतील पर्यटन स्थळेही नटली आहेत. मुंबईत वर्षाच्या शेवटी मोठ्या प्रमाणात पर्यटन दाखल झालेत. त्यानिमित्तानं बेस्टकडून गेटवे ऑफ इंडिया, ( Gateway of India 0 जुहू चौपाटी, गोराई बीच आणि इतर महत्त्वाच्या पर्यटन स्थळी अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार आहेत.
  • वाहनांची तपासणी : ड्रंक आणि ड्राईव्ह रोखण्यासाठी ब्रेथ अनालायझर द्वारा प्रत्येक वाहन चालकांची पोलिसांकडून तपासणी होणार आहे. कोरोना विषाणूचा धोका पाहता पुणे पोलिसांकडून युज अँड थ्रो पाईपचा होणार वापर. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सोबत वाहन जप्तीची येऊ शकते.
  • नागपुरात विशेष बंदोबस्त : ( Special settlement in Nagpur ) नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलिसांनी गुन्हेगारीच्या संभाव्य घटना आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी विशेष बंदोबस्त लावण्याचे नियोजन केले आहे. तसेच मद्य विक्री संदर्भातही पोलिसांचा वॉच असणार आहे.
  • मंदिरे, पर्यटनस्थळांवर तुफान गर्दी : नव्या वर्षाच्या निमित्ताने मंदिरे आणि पर्यटनस्थळी मोठी गर्दी झाली आहे. साई बाबांच्या दर्शनासाठी भाविक हजरोंच्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत. याबरोबरच सरत्या वर्षाला विठ्ठल दर्शनाने निरोप देण्यासाठी हजारो भाविक आणि पर्यटक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.