ETV Bharat / bharat

Top News Today : एका क्लिकवर वाचा, आजच्या महत्त्वाच्या बातम्या - Winter session 7TH day

देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर (Top News Today ) वाचा. आज दिवसभरात आजच्या महत्त्वाच्या घटना काय असतील ते जाणून घेवू (Top News Today in Marathi) या. आदित्य ठाकरेंच्या समर्थनाअर्थ आज ठाकरे गटाचे विधीमंडळात शक्तीप्रदर्शन होणार आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी होण्याची शक्यता आहे. कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे आज धरणे आंदोलन होणार आहे.

Top News Today
आजच्या महत्त्वाच्या बातम्या
author img

By

Published : Dec 26, 2022, 7:16 AM IST

मुंबई : आज ‘वीर बाल दिवस’ कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी होणार आहेत. विधीमंडळात आज ठाकरे गटाचे आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन होईल. जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात विरोधक आक्रमक आज आक्रमक भूमिका घेणार आहेत. आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री घेणार मोदींची भेट घेणार आहेत. तसेच अधिवेशनात महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता (Top News Today In Marathi) आहे.

आज ‘वीर बाल दिवस’ कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi in Bal Diwas program) दुपारी साडेबारा वाजता दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर ‘वीर बाल दिवसानिमित्त’ होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, सुमारे तीनशे बाल कीर्तनकारांचे ‘शबद कीर्तन’ होणार असून, पंतप्रधान त्यातही सहभागी होतील. तसेच, यावेळी नवी दिल्लीत निघणाऱ्या मुलांच्या मार्च पास्ट म्हणजेच फेरीलाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.

आज ठाकरे गटाचे आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन : आज ठाकरे गटाचे आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray in winter session) समर्थनार्थ विधीमंडळात शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि युवा सेना सचिव वरुण सरदेसाई नागपूरात दाखल झाले (Marathi News) आहेत.

जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात विरोधक आक्रमक : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( suspension of Jayant Patil) यांना विधानसभेतून या अधिवेशन काळापुरते निलंबित केल्यानंतर विरोधकांनी सभागृहात न बसण्याचा निर्णय घेतला होता. आजही जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात आजही विरोधक आक्रमक भूमिका घेणार आहेत. सकाळी १० वाजता महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्यानंतर सभागृहात बसायचे की नाही, यासंदर्भात विरोधी पक्ष निर्णय घेणार आहेत.

आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री घेणार मोदींची भेट : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi meet MP CM) यांची दिल्लीमध्ये भेट घेणार आहे. राज्यात सुरु असलेल्या कामाची माहिती शिवराज सिंह चौहान पंतप्रधान मोदींना देणार आहेत.

आज 'या' अधिवेशनात (Winter session 7TH day) महत्वाच्या प्रश्नांवर होणार चर्चा : विधानपरिषदेत उद्धव ठाकरेंसह सेना नेते कर्नाटकच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरणार आहेत. ठाकरे गटाचा सरकारला चर्चेचा प्रस्ताव तसेच विधानपरिषदेत पनवेलमधील सिडको नैना प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री निवेदन करण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेत राज्यातील गायरान जमिनीच्या प्रश्नावर सभागृहात महत्वाची चर्चा होऊ शकते. विधानसभेत लोकायुक्त कायदा विधेयक मांडण्यात येणार आहे.

आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे धरणे आंदोलन (Maharashtra Integration Committee march) : आज मराठीद्वेषी कर्नाटक सरकार आणि कानडी पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

आज विधानभवनावर 'अधिकार मोर्चा' : वीज उत्पादक जिल्हा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना २०० युनिट वीज मोफत मिळावी या मागणीसाठी आज विधानभवनावर 'अधिकार मोर्चा' (Rights march on Parliament House) आयोजित करण्यात आला आहे. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी हा बाईक मोर्चा आयोजित केला आहे. यासाठी सकाळी ७.३० वाजता जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौकातून बाईकस्वार कार्यकर्ते रवाना होतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.