ETV Bharat / bharat

Top News Today : दिवसभरात कोठे काय असणार आजच्या महत्त्वाच्या घडामोडी , वाचा एका क्लिकवर - Lalit Gandhi press conference today

आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेवू या. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. (Read Top News Today )

Top News Today
आजच्या महत्त्वाच्या घडामोडी
author img

By

Published : Nov 27, 2022, 7:21 AM IST

मुंबई : आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेवू या. आज मोदींची मन की बात, नाशिकमध्ये कृषीथॉन, मुंबईत तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा, जयंत पाटलांच्या मुलाचा विवाहसोहळा, ललित गांधी यांची पत्रकार परिषद, भारत-न्यूझीलंड दुसरा सामना या महत्त्वाच्या घडामोडी (Read Top News Today in Marathi) आहेत.

आज मोदींची मन की बात : आज मोदींची (PM Modi) मन की बात होणार आहे. हा मन की बात चा ९५ वा भाग आहे. सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

आज नाशिकमध्ये कृषीथॉनचे आयोजन : आज नाशिकच्या ठक्कर डोममध्ये आंतरराष्ट्रीय कृषीथॉनचे (Agrithon in Nashik) आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना उपयुक्त असणाऱ्या अनेक अधुनिक साधनांचे स्टॉल या प्रदर्शनात बघायला मिळत आहेत.

आज मुंबईत तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक : आज मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) आहे. त्यानुसार पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर या 3 मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे.

नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा : आज नोव्हेंबरला मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. राज्यातले सध्याचे वातावरण, त्याचच टिझर मनसेने लाँन्च केले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, सावरकर, राज्यपाल भरतसिंग कोश्यारी यांनी महाराजांबाबत केलेले विधान, हर हर महादेव चित्रपट वाद आणि शरद पवार यांच्या संदर्भात राज ठाकरे (Raj Thakarey) भाष्य करणार असल्याची चर्चा आहे.

जयंत पाटलांच्या मुलाचा विवाहसोहळा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP state president Jayant Patil) यांचा मुलगा प्रतिक याचा राहूल किर्लोस्कर यांची कन्या अलिका हिच्याशी शाही विवाहसोहळा होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार आणि इतर अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

आज ललित गांधी यांची पत्रकार परिषद : सोलापुरात विमानसेवा सुरु व्हावी, या मागणीसाठी मागील 22 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. सोलापूरकरांच्या या मागणीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने पाठिंबा दिलाय. यासंदर्भात चेंबर्सचे अध्यक्ष ललित गांधी सोलापुरात येत आहेत (Lalit Gandhi press conference today) . सोलापुरात त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे.

भारत-न्यूझीलंड दुसरा सामना : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना होणार (India New Zealand second match) आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.