टोकियो ऑलिम्पिकमध्ये 24 जुलैला भारत 14 स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. तिरंदाजी, निशानेबाजी आणि वेटलिफ्टिंग यामध्ये भारताला पदक मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी तिरंदाजीमध्ये भारताने एकही ऑलिम्पिक पदक जिंकलेले नाही.

Indian Certificate of Secondary Education कडून ICSE, ISC बोर्डाचे 10वी, 12वीचे निकाल जाहीर होणार आहेत. हा निकाल दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांसाठी खुला होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स CISCE ची अधिकृत वेबसाईट cisce.org वर पाहता येणार आहे. CISCE कडून परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याने त्यामुळे निकाल हा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार केला जाणार आहे.

नासाने एका मोठ्या मैदानाच्या आकाराएवढा मोठा लघुग्रहावर (अॅस्टेरॉईड) पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचा इशारा दिला आहे. हा लघुग्रह फार वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. या लघुग्रहाचे नाव २००८ जीओ २० असे आहे. २४ जुलै रोजी हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे.

इश्वरन, साहा आणि भरत अरुण यांचा विलगीकरण काळ 24 जुलैला संपणार आहे. तिघांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण काही काळ ते आयसोलेशनमध्ये राहणार आहेत.

संत निवृत्तीनाथ महाराज मठात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीने मुक्काम केला होता. यंदा पंढरपुरच्या वारीत शिवशाहीने ४०० किमीने प्रवास करत पालखी पंढरपुरात दाखल झाली होती. ही पालखी आज परतीच्या प्रवासाला लागणार आहे.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली होती. ही संचारबंदी दुपारपर्यंत लागू राहणार आहे. पौर्णिमेचा काला झाल्यानंतर सर्व पालख्या पंढरपुराततून बाहेर पडल्यानंतर संचारबंदी शिथिल होणार आहे.

Flipkart Big Saving Days सेल आज मध्यरात्रीपासून फ्लिपकार्ट प्लस मेंबरसाठी सुरू होणार आहे. तर २५ जुलैला मध्यरात्रीपासून सर्वांसाठी सेल उपलब्ध होणार आहे. हा सेल २९ जुलैपर्यंत राहणार आहे.

मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे.

शनिवारी (24 जुलै) सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. अतिवृष्टीमुळे पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये पुराच्या पाण्यातील अडकलेला कचरा काढण्यासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

कांदिवली (पश्चिम) हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलात खासगी स्तरावर बनावट लसीकरण झाले होते. या संकुलातील रहिवाशांना आज महापालिकेकडून महावीरन गर परिसरात लस दिली जाणार आहे.
