राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली.
ओबीसी आरक्षणप्रश्नी राज्य शासनाने केलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात भाजपकडून आज सकाळी ११ वाजता राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहेत. यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाणार असल्याची दाट शक्यता आहे.
खासदार शरद पवार, खासदार संजय राऊत, मंत्री सुनिल केदार बालेवाडीतील क्रीडा संकूलनाची पाहणी करणार आहेत.
सक्तवसुली संचनालय (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई व नागपूरच्या घरी छापा मारण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शंभर कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचे आरोप अनिल देशमुख यांच्यावर केले होते. त्यामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
आमदार विनायक मेटे हे मराठा आरक्षणाबाबत औरंगाबाद येथे मेळावा घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा नेते आरक्षणासाठी विविध बैठका घेत आहेत.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाबाबत आज दुपारी दोन वाजता लोणावळा येथे बैठक बोलावली आहे. भाजप आज राज्यात विविध आंदोलन करणार आहे. त्या पार्श्वभूमी वडेट्टीवार हे रणनिती आखणार असल्याची चर्चा सुरू आहे.
सिने अभिनेता अर्जुन कपूर याचा आज वाढदिवस आहे. 'इशकजादे' या चित्रपटातून त्याने आपली कारकीर्द सुरू केली.
देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत आज राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरण होणार आहे. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मेपासून 18 ते 44 वर्षांमधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. राज्यात लसीचा पुरवठा होत नसल्याने अनेक वेळा लसीकरण ठप्प झाले आहे.
राज्यात मान्सून दाखल झाला असून आज कोकण, मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा...