- झाशीची राणी बलिदान दिवस
दत्तक वारस नामंजूर केला म्हणून इंग्रजांशी झुंजणारी पराक्रमी महिली झाशीची राणी आज बलिदान दिवस देशभर साजरा होणार आहे.
- केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लिबर्टी उड्डाणपुलाच्या सुशोभिकरणाचे उद्घाटन
शुक्रवार १ जून रोजी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लिबर्टी उड्डाणपुलाच्या सुशोभिकरणाचे उद्घाटन होईल. 55.5555 कि.मी. लांबीच्या उड्डाणपुलाचे सुशोभीकरण व रंगीबेरंगी करण्यात आले आहे.
- मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांची पत्रकार परिषद
मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांची पत्रकार परिषद होणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणुका आणि इतर राजकीय मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता.
- भाजप नेते आशिष शेलार पत्रकार परिषद
भाजप नेते आशिष शेलार शुक्रवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाई प्रश्नावर पत्रकार परिषद होणार आहे.
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख याचिकेवर सुनावणी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी.
- परिवहन मंत्री अनिल परब पुणे दौर्यावर
परिवहन मंत्री अनिल परब शुक्रवारी पुणे दौर्यावर आहेत. शिवाजीनगर बसस्टँडला भेट देणार आहेत.
- विभागीय आयुक्तांची बैठक
आषाढी वारी संदर्भात वारकरी संघटनांसह विभागीय आयुक्तांची बैठक होणार आहे.
- उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौरा
उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी बीड जिल्ह्यात येत आहेत. पीक कर्ज वितरण, कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची सद्यस्थिती तसेच पीक विम्यावर अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक आज आहे.