नवी दिल्ली : फिफा विश्वचषक २०२२ मध्ये (FIFA World Cup) अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या स्पर्धेची ही 22वी आवृत्ती आहे. यंदाही सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या स्पर्धेत अनेक खेळाडू चमक दाखवत आहेत. या लेखात आपण फुटबॉल विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या पाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार (Most Goals In FIFA) आहोत. या खेळाडूंमध्ये जर्मनीचे 2, ब्राझीलचे 2 आणि फ्रान्सचे 1 खेळाडू आहे. त्यात पेले, मुलर, रोनाल्डोसारखे खेळाडू आहेत.
मिरोस्लाव क्लोस - जर्मनीचा दिग्गज फुटबॉलपटू मिरोस्लाव क्लोस याने या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल केले आहेत. मिरोस्लाव क्लोसने 24 सामन्यांत 16 गोल केले आहेत. 2002 ते 2014 या चारही विश्वचषकांमध्ये जर्मनी संघाचा भाग (most goals in FIFA World Cup list) आहे.
रोनाल्डो : ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने स्पर्धेच्या इतिहासात 19 सामन्यांत 15 गोल केले आहेत. 1998 च्या विश्वचषकात रोनाल्डोने शानदार खेळ दाखवत 4 गोल केले. 2002 मध्ये 8 गोल आणि त्यानंतर 2006 च्या विश्वचषकात तीन गोल (FIFA World Cup players list ) केले.
गेर्ड मुलर : जर्मनीच्या या महान फुटबॉलपटूने केवळ दोन विश्वचषक खेळताना 14 गोल केले. त्याने 1970 च्या विश्वचषकात 10 आणि 1974 मध्ये 10 गोल केले होते.
जस्ट फॉन्टेन : विश्वचषक 1958 मध्ये 13 गोलांसह, फ्रान्सच्या जस्ट फॉन्टेनने एकाच स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम केला. सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
पेले : ब्राझीलचा महान फुटबॉलपटू पेलेचे नावही या यादीत सामील आहे. त्याने 14 सामन्यात 12 गोल केले आहेत. 1958 च्या विश्वचषकात 6 गोल, 1962 आणि 1966 मध्ये प्रत्येकी एक गोल आणि 1970 मध्ये 4 गोल केले. या चार विश्वचषकांपैकी ब्राझीलने तीनदा ट्रॉफी जिंकली. ब्राझीलला जेतेपद मिळवून देण्यातही पेलेचा मोलाचा वाटा (players scored most goals in FIFA World) होता.