ETV Bharat / bharat

PM Modi Speech in Goa Election : गोव्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी 'या' 5 मुद्द्यांवर दिला भर - गोवा विधानसभा निवडणूक मोदी भाषण

गोवा विधानसभेच्या निवडणुकीडे ( Goa Assembly election 2022 ) संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यामधील प्रचारसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा ( PM slammed congress over Goa freedom ) साधला. दुसरीकडे गोव्यातील विकासकामांबद्दल विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुकही ( PM praised Goa CM Pramod Sawant ) केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Feb 10, 2022, 10:01 PM IST

Updated : Feb 10, 2022, 10:36 PM IST

पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ( Narendra Modi Speech in Goa campaign ) विविध मुद्द्यांना हात घालत गोवेकरांना भाजपच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. या प्रचासभेत पंतप्रधानांनी गोव्याला स्वातंत्र्याला लागलेला उशीर, काँग्रेसची सत्ता असताना गोव्याकडे झालेले दुर्लक्ष, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेले काम आणि गोव्यात सुरू असलेल्या विकासकामे या मुद्द्यांवर भाषणात दिला. जाणून घेऊ, भाषणातील महत्त्वाचे ( highlights of PM Modi Speech in Goa ) मुद्दे

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे
  1. गोव्याच्या स्वातंत्र्यावरून काँग्रेसवर टीका ( PM slammed congress over Goa freedom ) - गोवा मुक्तीसंग्रामला उद्धवस्त करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यास काँग्रेसमुळे उशीर झाला. काही तासांचे काम मात्र, त्याला 15 वर्षे लागले. गोव्यातील लोकांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागला. सत्याग्रह करावा लागला. त्यांनी मदत केली नाही. गोव्याच्या स्वातंत्र्यासांठी सैनिक पाठविणार नसल्याचे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी लाल किल्ल्याच्या भाषणातून सांगितले. हे तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. ही काँग्रेस तुम्हाला मते मागत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
  2. काँग्रेसने गोव्यातील नागरिकांचे स्वप्ने समजली नाहीत ( Modi slammed congress over Goa development ) - 100 टक्के योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही खरी धर्मनिरपेक्षता आहे. गोव्यातील नागरिकांची राजकीय जाणीव अधिक आहे. मात्र, काँग्रेसला गोव्यातील तरुण आणि नागरिकांची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा समजू शकली नाहीत. त्यांनी गोव्याबाबत शत्रुत्वाची भावना ठेवली आहे. हे आजच्या पिढीने जाणायला हवे. ते इतिहासात लपून ठेवले आहे. काँग्रेसमुक्त कोट्यवधी नागरिकांचा संकल्प झाला आहे. केवळ गोव्यात फिरण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना आठवण येत होती, पंतप्रधानांनी काँग्रेसला टोला लगावला. काँग्रेसने पाच दशक राज्ये केली. पण दिल्लीच्या तख्तावर बसून त्यांना गोव्याची विकासासाठी आठवण येत नव्हती. काँग्रेस नेते फिरण्यासाठी केवळ गोव्यात येत होते, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
  3. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक ( PM praised Goa CM Pramod Sawant ) - कोरोनाच्या काळात योजना राबविण्यात सहभाग नोंदविल्याने पंतप्रधानांनी नागरिकांचे अभिनंदन केले. तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, की योजना ही 100 टक्के लाभापर्यंत पोहोचणे हे भाजपच्या कार्यशैलीचे उदाहरण आहे. भाजप सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे 365 दिवस पर्यटक गोव्यात येत आहेत. 2021 साली 25 लाख पर्यटक गोव्यात येत होते. 2019 साली भाजप सरकारमध्ये पर्यटकांची संख्या 1 कोटीहून अधिक झाली आहे. पायाभूत सुविधांचा गोव्याला फायदा होत आहे. येथे पर्यटक असल्याने गोवेकरांना लाभ होत आहे. तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
  4. 125 कोटींहून अधिक नागरिकांचे देशात लसीकरण ( PM Modi over Corona Vaccination ) - कोरोना ही 100 वर्षांतून एकदा येणारी महामारी जगात आली आहे. मागील सरकार असते तर लसीकरण एवढे झाले असते का? 125 कोटींहून अधिक नागरिकांचे देशात लसीकरण झाले असते का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. गोवा सरकारने 100 कोरोना लसीकरण केल्याबद्दल त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केले. लशींसाठी 30 ते 40 वर्षे भारत हा विदेशावर अवलंबून राहत होता.
  5. गोव्यात पर्यटनासह विकास करण्याची ग्वाही ( PM Modi on Goa tourism ) - पंतप्रधान मोदी म्हणाले, की देशात पर्यटन वाढविण्यासाठी गोव्यात पर्यटन वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी 5 हजार कोटींची सागरमाला प्रकल्प तयार होत आहे. 3 हजार कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आहे. त्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल. व्यापार आणि इतर उद्योगांना चालना मिळेल. भाजपने जे काम केले आहे, त्याची अनेक दशंकापासून गोव्याला गरज होती. मांडवीय नदीवर अटल ब्रिजचे काम गोवा सरकारने केले आहे. गोव्याची खास संस्कृती आणि ओळख आहे. दक्षिण गोव्याप्रमाणे उत्तर गोव्याचाही विकास होईल, अशी पंतप्रधान मोदींनी ग्वाही दिली आहे. भाजपला दिलेले मत हे स्थिर आणि प्रगतीशील सरकारला दिलेले मत आहे. गोव्याच्या जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिलेले मत आहे. भाजपवर विश्वास दाखवावा आणि 14 फेब्रुवारीला भाजपला मौलिक मत द्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले.

Last Updated : Feb 10, 2022, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.