ETV Bharat / bharat

Petrol, diesel prices: पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; 13 दिवसात वाढले 8 रुपये

रविवारी पुन्हा एकदा देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol, diesel prices) प्रत्येकी 84 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. साडेचार महिन्यांचे दीर्घकालीन अंतर संपल्यानंतर किमतींमध्ये झालेली ही 11वी वाढ आहे आजच्या वाढीनंतर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and diesel prices in Mumbai) प्रति लिटर 118.41 रुपये (84 पैशांनी वाढले) आणि 102.64 रुपये (85 पैशांनी वाढले) आहेत. गेल्या 13 दिवसात हे दर 8 रुपयांपेक्षा जास्त ने वाढले आहेत.

Petrol, diesel prices
पेट्रोल, डिझेलचे दर
author img

By

Published : Apr 3, 2022, 9:24 AM IST

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रविवारी पुन्हा प्रत्येकी 84 आणि 85 पैशांनी वाढ झाली असून, दोन आठवड्यांच्या आत म्हणजे 13 दिवसात एकूण दर 8 रुपये प्रति लिटर पेक्षा जास्तने वाढली आहेत. राज्य इंधन किरकोळ विक्रेत्यांच्या किमतीच्या अधिसूचनेनुसार, मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 118.41 रुपये (84 पैशांनी वाढले) आणि 102.64 रुपये (85 पैशांनी वाढले) आहेत. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत आता 103.41 रुपये प्रति लीटर आहे जी पूर्वी 102.61 रुपये होती, तर डिझेलचे दर प्रति लिटर 93.87 रुपये वरून 94.67 रुपये झाले आहेत.

देशभरात दर वाढवले ​​गेले आहेत आणि स्थानिक कर आकारणीच्या घटनांवर अवलंबून राज्यानुसार बदलू शकतात. 22 मार्च रोजी दर सुधारणेतील साडेचार महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर ही 11वी वाढ आहे. एकूणच पेट्रोलचे दर प्रति लिटर 8 रुपयां पेक्षा जास्तने वाढले आहेत. शनिवारी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येकी 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती, गेल्या 12 दिवसांतील एकूण दरांमध्ये वाढ होऊन ते 7.20 रुपये प्रति लिटरवर पोहोचले होते. चार राज्यांच्या निवडणुकांच्यावेळी हे दर स्थिर ठेवण्यात आले होते त्यामुळे झालेला तोटा भरुन काढण्यासाठी ही दरवाढ सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • Price of petrol & diesel in Delhi at Rs 103.41 per litre & Rs 94.67 per litre respectively today (increased by 80 paise)

    In Mumbai, the petrol & diesel prices per litre at Rs 118.41 (increased by 84 paise) & Rs 102.64 (increased by 85 paise). pic.twitter.com/oVaUVY2BTc

    — ANI (@ANI) April 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - High of GST Collection : मार्चमध्ये 1.42 लाख कोटींरुपयांसह जीएसटी संकलन सर्वकालीन उच्चांकावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.