ETV Bharat / bharat

RBI Monetary Policy : आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली घोषणा, म्हणाले - 'भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात...' - रेपो रेट

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली.

RBI Monetary Policy
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास
author img

By

Published : Apr 6, 2023, 11:32 AM IST

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेची तीन दिवस चाललेली पतधोरण आढावा बैठक आज संपली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जाहीर केले की, रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जागतिक आर्थिक परिस्थिती आणि चलनवाढ लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. सहा सदस्यीय समितीने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • RBI keeps the repo rate unchanged at 6.5% with readiness to act should the situation so warrant, announces RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/8UoBu5P6tx

    — ANI (@ANI) April 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारतातील चलनवाढीचा कल : फेब्रुवारीमध्ये झालेल्या एमपीसीच्या बैठकीत, आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंटची वाढ केली. ते मे 2022 पासून सहाव्यांदा वाढून 2.5 टक्क्यांवरून वाढले आहे. परंतु असे असूनही, महागाई बहुतेक वेळा रिझर्व्ह बँकेच्या सहा टक्क्यांच्या समाधानकारक पातळीच्या वर राहिली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2022 मध्ये सहा टक्क्यांच्या खाली राहिल्यानंतर, किरकोळ चलनवाढीने जानेवारीमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची समाधानकारक पातळी ओलांडली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर जानेवारीमध्ये 6.52 टक्के आणि फेब्रुवारीमध्ये 6.44 टक्के होता. विशेष म्हणजे रेपो रेट हा दर आहे, ज्यावर भारतीय रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते. महागाई नियंत्रित करण्यासाठी सरकार रेपो दरात वाढ करते.

रेपो दराबाबत अमेरिकन सेंट्रल बँकेची भूमिका : मार्च 2023 मध्ये अमेरिकेच्या दोन मोठ्या बँका एका आठवड्यात बुडाल्या. त्यापैकी एक तिथली 16 वी सर्वात मोठी बँक होती, सिलिकॉन व्हॅली बँक आणि दुसरी सिग्नेचर बँक होती. या बँका बुडाल्यानंतर युरोपातही बँकिंग संकट आले. स्वित्झर्लंडची स्विस बँक दिवाळखोरीत निघणार आहे. जगभरात बँकिंग क्षेत्रातील समभाग घसरू लागले. अशा विचित्र परिस्थितीतही अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने फेब्रुवारीमध्ये रेपो दरात वाढ केली. बँकेचे मुख्य लक्ष महागाई नियंत्रणावर आहे. त्यामुळे आरबीआय रेपो दरातही वाढ करेल अशी अपेक्षा होती.

हेही वाचा : Save From First Salary : भारतीय तरुण बचतीबाबत आहेत निष्काळजी ; पहिल्या पगारापासून 'अशी' करायला हवी बचत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.